निकालापूर्वीच सत्यजित तांबेंचे झळकले विजयी बॅनर्स; अजित पवार म्हणाले, त्यांचा आत्मविश्वास....

निकालापूर्वीच सत्यजित तांबेंचे झळकले विजयी बॅनर्स; अजित पवार म्हणाले, त्यांचा आत्मविश्वास....

विधान परिषद शिक्षक-पदवीधर मतदारसंघाचा निकाल आज जाहीर होणार आहे. हा निकाल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे

पुणे : विधान परिषद शिक्षक-पदवीधर मतदारसंघाचा निकाल आज जाहीर होणार आहे. हा निकाल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. यामध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे विशेष लक्ष लागले आहे. या निवडणुकीची मतमोजणी सुरु असली तरीही सत्यजित तांबे यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले आहेत. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केले आहे.

सत्यजित तांबे यांना खात्री असेल म्हणून त्यांचे पोस्टर लागले असतील. काय काय जण असतात मतमोजणीच्या आधीच मिरवणूक काढतात, कारण त्या दिवशी परवानगी नसते. पण, त्यांचा गाढा आत्मविश्वास असेल त्यामुळे त्यांनी केलं असेल, असे अजित पवार यांनी म्हंटले आहे.

निकालापूर्वीच सत्यजित तांबेंचे झळकले विजयी बॅनर्स; अजित पवार म्हणाले, त्यांचा आत्मविश्वास....
कोकणात महाविकास आघाडीला धक्का; भाजपाच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंचा विजय

कसबा पोटनिवडणुकीच्या उमेदवारीवर अजित पवार म्हणाले की, जयंत पाटील यांच्या सांगण्यावरून आज कसबा आणि चिंचवड मतदारसंघाबद्दल पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. पदाधिकाऱ्यांना काय वाटतं हे जाणून घेणार आहे. दोन्ही जागेवर कोण, कुठे लढेल याबाबत तिन्ही पक्ष बसून ठरवतील. प्रत्येकाला लढणार अस म्हणण्याचा अधिकार आहे. जो निर्णय होईल तो आम्हा तिघांना मान्य असेल.

अर्थसंकल्प चुनावी जुमला असल्यासारखं सादर झालं आहे. शेतकऱ्यांच्या साखर कारखान्यासंदर्भात जो टॅक्स लावला जात होता. तो विषय कालच्या बजेटमध्ये निकाली निघाला आहे. याचं समाधान मला शेतकरी आणि ऊस उत्पादक म्हणून आहे. त्याबद्दल मी केंद्र सरकारच अभिनंदन करतो. नऊ राज्यांना डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प केला असं दिसत आहे. कर्नाटकला साडेतीन हजार कोटींची मदत केली आहे. मात्र, त्याच्याच बाजूला लागून असलेल्या महाराष्ट्र राज्याला काहीच नाही, अशी टीकाही अजित पवार यांनी केली आहे.

केंद्र आणि राज्यातील चौकशा करणाऱ्या यंत्रणांना त्यांचे अधिकार आहे. आता याच्या पाठीमागचं नक्की कारण काय? सारख्या सारख्या तिथेच का रेड पडतात. याबद्दल स्वतः हसन मुश्रीफच सांगू शकतात. काल त्यांनी स्टेटमेंट दिलं आहे. आपण पाहिलं तर पाठीमागच्या काळात काही जणांना बोलवण्यात आले होत. त्यांना नोटिसा देण्यात आला होता. पण काही राजकीय समीकरणे बदलली. आणि त्यांना बोलवणे थांबलेल दिसत आहे. वास्तविक देशाच्या ७५ वर्षाच्या इतिहासात असं कधी घडत नव्हते. पण आता ते घडत आहे. परवा संसदेतही विरोधी पक्षाच्या खासदारांनी हा प्रश्न मांडला होता, असेही अजित पवार यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com