Ajit Pawar | Chandrakant Patil
Ajit Pawar | Chandrakant PatilTeam Lokshahi

पुण्यात एक मंत्री आलेत ते पण कोल्हापूरवरुन अन्...; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना चिमटा

विरोधी पक्ष नेते अजित पवार निवडणुकीच्या तयारीसाठी औरंगाबादेत आहेत. नवनिर्वाचित सिनेट सदस्यांचा अजित पवारांकडून सन्मान केला जाणार आहे.

औरंगाबाद : विरोधी पक्ष नेते अजित पवार निवडणुकीच्या तयारीसाठी औरंगाबादेत आहेत. नवनिर्वाचित सिनेट सदस्यांचा अजित पवारांकडून सन्मान केला जाणार आहे. यावेळी अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. भाजपने वाचाळवीरांना रोखावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच, प्रत्येकांनी आपापले काम करा, दुसऱ्याच्या कामात नाक खुपसू नये, असा जोरदार टोला अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

Ajit Pawar | Chandrakant Patil
घरावर ईडीची छापेमारी; हसन मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाले…

राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सावरत असताना, काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते. पण, त्याची अंमलबजावणी करताना आपले सरकार गेले. त्यामुळे जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्ही मदत करू, सहकार्य करू असा विश्वास व्यक्त करतो. आता जे राज्यात चाललंय ते फार काही समाधानकारक चित्र नाही. काय बोलावं, काय वक्तव्य करावं? आम्ही 30-30 वर्ष राजकारण करतोय. नेहमीच जे प्रकार सुरू आहेत, ते विसरुन जाता नये. आपल्या पक्षातले वाचाळवीरांना लक्ष्यात आणून दिले पाहिजे होते, असे अजित पवार यांनी म्हंटले आहेत.

या परिसरात मंत्रिमंडळात स्थान मोठे मिळाले आहे. काहीजण आणखी सुटबुट घालून बसलेत. पुण्यात एक मंत्री ते पण कोल्हापूरवरुन आलेत. निवडणुकीनंतर उणीधुणी काढून आरेला कारे म्हणत बसण्यापेक्षा काम केले पाहिजे. कोणी म्हणतं छत्रपती संभाजी नाव द्या, काही जण म्हणतात धर्मवीर संभाजी द्या. प्रत्येकांनी आपापले काम करा, दुसऱ्याच्या कामात नाक खुपसू नये, असा जोरदार टोला अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

Ajit Pawar | Chandrakant Patil
विरोधी पक्षावर दबावाचे राजकारण; मुश्रीफांवरील कारवाईवर राऊतांची प्रतिक्रिया

दरम्यान, अजित पवारांच्या टीकेला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी त्यांना चिमटा काढला होता. तुम्ही कोणाला घाबरत नाही तर चार दिवस कुठे लपून बसला होता. त्यामुळे दुसऱ्यावर दगड फेकताना, आपण काचेच्या घरात बसलो आहे. हे लक्षात ठेवल पाहिजे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com