नार्वेकरांसमोरच कोल्हेंची जोरदार फटकेबाजी; म्हणाले, मांडलिकत्व पत्करण्यापेक्षा मी...

नार्वेकरांसमोरच कोल्हेंची जोरदार फटकेबाजी; म्हणाले, मांडलिकत्व पत्करण्यापेक्षा मी...

राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरु झाली आहे. यावेळी अमोल कोल्हे यांचीही साक्ष नोंदवण्यात आली.

मुंबई : राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरु झाली आहे. या सुनावणीत शरद पवार गटाच्या साक्षीदारांची उलट साक्ष सुरु आहे. यावेळी अमोल कोल्हे यांचीही साक्ष नोंदवण्यात आली. यादरम्यान अमोल कोल्हेंनी नार्वेकरांसमोरच जोरदार फटकेबाजी केली.

नार्वेकरांसमोरच कोल्हेंची जोरदार फटकेबाजी; म्हणाले, मांडलिकत्व पत्करण्यापेक्षा मी...
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचं पुण्यात जंगी स्वागत, लाखो मराठा बांधव रस्त्यावर

२ जुलै २०२३ रोजी अजित पवार यांनी तुम्हाला कॉल करुन तुम्हाला घरी बोलावले होते का? अजित पवार गटाच्या वकिलांच्या प्रश्नावर अमोल कोल्हे म्हणाले की, २ जुलैला नाही, तर मला १ जुलैला कॉल आला होता. तो सुनिल तटकरे यांनी केला होता. त्यांनी मला अजित पवार यांच्या घरी बोलावले होते. ३० जूनच्या प्रतिज्ञापत्रावर माझी २ जुलैला सही घेण्यात आली. त्याचा वापर कशासाठी होणार त्याची कुठलीही पूर्व कल्पना नव्हती. त्यात फक्त अजित पवार यांना पाठिंबा आहे, एवढेच नमूद होते. त्याचा हेतू हा स्पष्ट नव्हता, तसेच तो निवडणूक आयोगाकडे पाठवल्यानंतर त्यामागील हेतू हा नक्कीच धक्कादायक होता. मला फुटीची पुसटशीही कल्पना नव्हती, असे त्यांनी म्हंटले आहे.

तुमचे प्रतिज्ञापत्रात जे आधी दिले अणि नंतर दिले ते एवढ्यासाठी बदलले कारण तुम्ही तुमचा पाठिंबा बदलला आणि तो बदलण्याला काही अर्थ नाही, असे अजित पवार गटाचे वकिलांनी म्हंटले असता अमोल कोल्हे यांनी हे खरे नसल्याचे स्पष्ट केले. हा मुद्दा तत्वाचा आहे. मतदारांचा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींकडून विश्वास कसा राहील. मूल्य आणि तत्व यावर लोकांचा विश्वास कसा राहील? ही कारणे खूप वरवरची वाटत असली तरी खरी आहे.

मी संसदेत अनुभवले की ४८ पैकी ३९ खासदारांनी त्यांचे तोंड बंद ठेवले होते. जेव्हा कांद्याच्या निर्यात बंदीवर बोलले नाही. महाराष्ट्रातून जाणाऱ्या उद्योगावर बोलले नाही. कापूस, सोयाबीन, शेतकरी यांच्या प्रश्नावर मला बोलायला मिळणार नसेल तर असे मांडलिकत्व पत्करण्यापेक्षा मी लढणे पसंत करेन. मला वाटते हे महाराष्ट्राच्या हिताचे कारण आहे, अशी जोरदार फटकेबाजी अमोल कोल्हेंनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com