राऊतांना दुसऱ्याच्या घरात डोकावायची जास्त सवय; आशिष शेलारांचा टोला

राऊतांना दुसऱ्याच्या घरात डोकावायची जास्त सवय; आशिष शेलारांचा टोला

संजय राऊतांच्या सामना रोखठोकमधील दाव्याला आशिष शेलारांचे प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीलाही फोडण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचा आरोप संजय राऊतांनी सामना रोखठोकमधून केला आहे. तर, उध्दव ठाकरे आणि शरद पवारांच्या भेटीत काय घडले हेही संजय राऊतांनी सांगितले आहे. कुटुंबाला टार्गेट केले जातयं, पण पक्ष म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही, असे ठाकरे-पवार यांचे मत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राऊतांना दुसऱ्याच्या घरात डोकावायची जास्त सवय; आशिष शेलारांचा टोला
अजित पवारांनी घेतली अमित शहांची भेट? स्वतः केला खुलासा, म्हणाले...

मंगळवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शरद पवारांना भेटलो. ते म्हणाले, कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण ’पक्ष’ म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही. महाराष्ट्रातील लोकांत सध्याच्या सरकारबद्दल कमालीचा संताप आहे. जे आता भाजपबरोबर जातील ते राजकीय आत्महत्या करतील असे पवार-ठाकरे यांचे मत पडले, असे संजय राऊतांनी म्हंटले आहे.

ईडीच्या दहशतीने लोकांना फोडणे हे सभ्य लोकांचे राजकारण नाही. राजकारणात राहून लोकांनी अमाप संपत्ती कमावली. ती टिकविण्यासाठी त्यांना सत्तेची कवचकुंडले हवीच असतात. घाऊक पक्षांतरे त्यातून होतात. पवार यांनी एक चांगला मुद्दा मांडला, आज जे भीतीने पक्ष सोडत आहेत त्यांना मी सांगतो, तुम्ही भाजपात गेल्याने टेबलावरची फाईल कपाटात जाईल, पण या ईडी-सीबीआयच्या फाईली कधीच बंद होत नाहीत, असे शरद पवार म्हणाल्याचे संजय राऊतांनी सांगितले.

काय म्हणाले आशिष शेलार?

संजय राऊत यांना दुसऱ्याच्या घरात डोकावायची जास्त सवय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांना त्यांच्या पक्षाबद्दल काय म्हणायचंय याची प्रतिक्रिया संजय राऊत देत आहेत. त्याला महत्त्व किती द्यायचं. त्याची किंमत काय, अशा शब्दात आशिष शेलार यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com