Uddhav Thackeray | Ashish Shelar
Uddhav Thackeray | Ashish ShelarTeam Lokshahi

'आधे इधर गए... आधे उधर गए.. अकेले असरानी बच गएं'

आशिष शेलारांचा उध्दव ठाकरेंवर निशाणा

मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूनमधील खेड येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसेना आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र डागले. उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आता महाराष्ट्रात "असरानी" जिथे जिथे फिरतील तिथे तुफान मनोरंजन होणार, अशी टीका शेलार यांनी केली आहे.

Uddhav Thackeray | Ashish Shelar
कालच्या तमाशाला १९ तारखेला उत्तर देईन, बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही - रामदास कदम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून ज्यांनी महाराष्ट्रात मते मिळवली आणि नंतर गद्दारी केली. तेच आज आम्हाला मोदींच्या फोटोवरून आव्हान देतात? कोकणात शिमगा असल्याने जनता फारसे गांभीर्याने घेणार नाही. कालच्या सभेतील सोंगांनी आणि बोंबा मारायच्या कार्यक्रमाने मनोरंजन झाले. आधे इधर गए... आधे उधर गए.. अकेले "असरानी" बचगएं आता महाराष्ट्रात "असरानी" जिथे जिथे फिरतील तिथे तुफान मनोरंजन होणार, अशी जोरदार टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

दरम्यान, उध्दव ठाकरेंनी सभेत शिवसेना-भाजपवर टीकास्त्र सोडले होते. जे भुरटे, गद्दार, चोर आहेत तोतया आहेत. मला त्यांना सांगायचे तुम्ही शिवसेना नाव चोरू शकतात पण शिवसेना नाही.धनुष्य बाण चोरू शकताल पण पेलू शकणार नाही. मी मागे बोललो रावण उताणा पडला धनुष्य घेऊन तर हे मिंधे कुठे पेलू शकणार? हे ढेकणं आपले रक्त पेवून फुगलेली आहे. त्यांना चिरडण्याची ताकद तुमच्या एका बोटात आहे. मतदानाचा दिवशी एक बोट त्यांना चिरडणार आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com