मविआत जागावाटप कसं ठरणार? अशोक चव्हाणांनी सांगितले सूत्र

मविआत जागावाटप कसं ठरणार? अशोक चव्हाणांनी सांगितले सूत्र

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांनी तयारी सुरु केली आहे. जागावाटपावरुन महाविकास आघाडीत मंथन सुरु आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांनी तयारी सुरु केली आहे. जागावाटपावरुन महाविकास आघाडीत मंथन सुरु आहे. अशात, कॉंग्रेसची आज महत्वपूर्ण बैठक पार पाडली. या बैठकीतील माहिती कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे. आम्ही लोकसभेवर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. महाराष्ट्रामध्ये मविआ एकत्र लढली पाहिजे, अशी भूमिका असल्याचे अशोक चव्हाण यांनी मांडली आहे.

मविआत जागावाटप कसं ठरणार? अशोक चव्हाणांनी सांगितले सूत्र
शिंदे-पवार भेटीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये जागा वाटपासंदर्भात बैठका पार पडल्या. आपल्या जागांसंदर्भात आढावा घेऊन वाटप करायला हवं, अशी भूमिका मविआने घेतली. त्यामुळे सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे ती जाणून घेण्यासाठी ही आढावा बैठक घेतली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांची भूमिका जाणून घेतली. मतदारसंघात काय केलं पाहिजे. तिथला फीडबॅक जाणून घेतला. जागा किती लढायच्या याबाबत नंतर ठरवलं जाईल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

महाराष्ट्रामध्ये मविआ एकत्र लढली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. मतांचं ध्रुवीकरण होऊ नये. कोणत्या मतदारसंघात कोणाची किती ताकद आहे त्यानुसार पाठिंबा दिला जाईल. प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख आहेत त्यांना जबाबदारी दिली जाईल.

कोण उमेदवार उभा केला तर जिंकणार हे डोळ्यासमोर ठेवूनच उमेदवार ठरवावा. महाविकास आघाडी म्हणून लढावं अशी मतं आहेत. ग्राउंड लेव्हल वर पण मतं जुळली पाहिजेत आणि याबाबत तीनही पक्षाच्या नेत्यांनी खबरदारी घ्यायला हवी. एखाद्या निवडणुकीमध्ये जागा कमी आल्या म्हणजे पुन्हा तसंच होईल असं नाही. आता आमचा एक खासदार आला म्हणजे आम्ही एकच जागा लढायची का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

स्थानिक पातळीवर परिस्थिती बदलत असते. लोकसभा निवडणुका लढायची असेल तर सहा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी घ्यायची असते. जो नेता जबाबदारी घेईल त्याला उमेदवारी दिली जाईल. विधानसभाध्ये जो उमेदवार 4-5 वेळा निवडून येत असेल तर त्याला उमेदवारी दिली जाऊ शकते, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, पुणे लोकसभा पोटनिवडणूक होणार नाहीत, अशी मला माहिती मिळाली आहे. या सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या नाहीत. परिस्थिती ही त्यांच्या विरोधात जात आहे. दोन दोन वर्षे निवडणुका घेतल्या जात नाहीत, अशी टीकाही अशोक चव्हाण यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com