राष्ट्रवादी भाजपसोबत हातमिळणी करणार? शिंदे गटाचे नेते म्हणाले; आम्हाला तर चालेलं, फक्त एकच अट
मुंबई : शरद पवारांनी राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी भाजपसोबत हातमिळवणी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच, शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. जर राष्ट्रवादी आमच्या सोबत येत असतील तर मजबूत आणखी होऊ, असे गोगावले यांनी म्हंटले आहे.
जर राष्ट्रवादी आमच्या सोबत येत असतील तर मजबूत आणखी होऊ. सरकार मजबूत होईल. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची विचारधारा वेगळी आहे. भाजपची विचारधारा वेगळी आहे. त्यांना आमची विचारधारा स्वीकारावी लागेल आम्ही त्यांची स्वीकारणार नाही, अशी अटही भरत गोगावले यांनी सांगितली आहे. जर ते आले तर थोडं मंत्रिपदाची संख्या कमी होईल. पण समोरुन आवाहन ते देत असतील तर आम्ही यावर विचार करू. आम्हाला तर चालेल, अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यासोबतच भरत गोगावले यांनी उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांची सभा महाडमध्ये होतीये. त्यांच्याकडे तिकडे उमेदवार नाहीये. माणिक जगताप यांचा तीन वेळेस पराभव केला आता त्यांच्या मुलीला उमेदवारी देणार असं बोलताय. त्यामुळे आम्ही चौथ्या वेळेस हरवू. त्यांच्याकडे उमेदवार नाही म्हणून हे अस ते करताय पण त्यांना यश मिळणार नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.
उद्धव ठाकरे यांच्याबद्दल शरद पवार यांनी लिहिलं ते योग्य लिहला. ते मंत्रालयात नेहमी आले असते तर हे अस झालंच नसत. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याआधी बाकी सगळ्यांना विचारायला हवं, असेही मत गोगावलेंनी व्यक्त केले आहे.