Chanadrashekhar Bawankule
Chanadrashekhar Bawankule Team Lokshahi

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष- बावनकुळे

शिंदे आणि भाजप युतीला राज्यातील जनतेचा स्पष्ट कौल चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

राज्यात राजकीय घडामोडी घडत असताना अशातच आज राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाने आपले वर्चस्व सिद्ध करून दाखवले आहे. या विजयानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाला स्पष्ट कौल दिला आहे. असे विधान यावेळी बावनकुळे यांनी केले.

Chanadrashekhar Bawankule
Maharashtra Board Exam Time Table : दहावी बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

आज नागपूर येथे पत्रकारांना बोलत असताना बावनकुळे म्हणाले की, "राज्यात मतदान झालेल्या ग्रामपंचायतींपैकी 581 च्या निकालाची माहिती उपलब्ध झाली असून भारतीय जनता पार्टीचे सरपंच 259 ठिकाणी निवडून आले आहेत.

या निवडणुकीतही भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाचे सरपंच 40 ठिकाणी निवडून आले आहेत.म्हणूनच शिंदे आणि फडणवीस सरकारच्या काळात थेट जनतेमधून सरपंच निवडण्याच्या निर्णयाचे जनतेने संपूर्णपणे स्वागत केले आहे. दोन्हीचा एकत्रित विचार करता पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये युतीचे सरपंच लोकांनी निवडून दिले आहेत. या कौलाबद्दल आपण मतदारांचे आभार मानतो आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो." अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली.

Lokshahi
www.lokshahi.com