तुमचे सर्वस्व शिवरायांच्या समाधीवर कधीही नतमस्तक झाले नाही : नितेश राणे

तुमचे सर्वस्व शिवरायांच्या समाधीवर कधीही नतमस्तक झाले नाही : नितेश राणे

जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावर नितेश राणे यांनी एक पत्रच ट्विट केले असून औरंगजेबांनी तोडलेल्या मंदिराची यादीच दिली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब क्रूर नसल्याचे म्हंटले होते. यावरुन आता राजकीय वातावरण तापले असून राजकीय वर्तुळातून टीका करण्यात येत आहेत. यावर भाजप नेते नितेश राणे यांनीही जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. नितेश राणे यांनी एक पत्रच ट्विट केले असून सोबत औरंगजेबांनी तोडलेल्या मंदिराची यादीच दिलेली आहे.

तुमचे सर्वस्व शिवरायांच्या समाधीवर कधीही नतमस्तक झाले नाही : नितेश राणे
मुख्यमंत्री शिंदेची जोगेंद्र कवाडेंच्या गटाबरोबर युती; विरोधकांना क्लीनस्वीप देणार

नितेश राणे म्हणाले की, आपण औरंग्याबाबाबत औरंगजेब क्रूर असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं ना? असे केलेले वक्‍तव्य स्वाभाविकच आहे. कारण आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे हे केव्हाच सिद्ध झाले आहे! कारण त्यांनी आपल्या तहआयुष्यात कधीही आमच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर एकदाही नतमस्तक केले नाही किंवा रायगडाच्या दिशेने त्यांचे कधी पाय वळाले नाही, असा टोला त्यांनी लगावला.

काकाप्रमाणे पुतण्यांही हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराज हे 'धर्मवीर' नाहीत असे घोषित करतो. औरंगजेबाने धर्मांतर करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांना नरक यातना दिल्या तरी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदूधर्मासाठी बलिदान दिले. आपल्या माहितीकरता मी आपल्याला या पत्रासोबत औरंग्याने तोडलेल्या हिंदू मंदिरांची यादी देत आहे. आपण हे तथ्य आपल्या मुघलशाहीच्या आस्थेपोटी स्वीकारणार नाही, असा निशाणाही राणेंनी आव्हाडांवर साधला आहे.

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?

संभाजी महाराजांचे डोळे फोडले त्याठिकाणी विष्णूचे मंदिर होते. ते औरंगजेबाने तोडलं नाही, तो क्रूर असता तर त्याने विष्णूचं मंदिर तोडलं असते, असे आव्हांनी म्हंटले होते. विधाना चुकीचे असल्याचे लक्षात येताच जितेंद्र आव्हाडांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन सारवासारव केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com