Pankaja Munde | Dhananjay Munde
Pankaja Munde | Dhananjay MundeTeam Lokshahi

'माझ्या निधीवर बदलून स्वतःचे नावं टाकले' पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा

अपघातात झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. ही घटना ताजी असतानाच, आता त्याच पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा अपघात झाला होता. त्यावेळी अनेक राजकीय मंडळींनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे आपल्या भावाची पंकजा मुंडे यांनी देखील भेट घेतली होती. त्यावेळी त्यांचा आता सर्व काही आलबेल आहे. असा चर्चा होत्या. मात्र, या चर्चा सुरु असतानाच आता पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे.परळीत एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी ही टीका केली आहे.

Pankaja Munde | Dhananjay Munde
आंध्र प्रदेशची 'ही' असणार आता नवी राजधानी; मुख्यमंत्री रेड्डींनी केली घोषणा

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत श्री संत नरहरी महाराज मंदिराच्या गाभारा आणि शिखर कामाचा तसेच पुनर्निर्माण कामाचे शुभारंभ आज परळी शहरात करण्यात आले. याच कार्यक्रमात बोलत असताना त्या म्हणाल्या की, मी हे केलं ते केले असं मला कधी मोजायची सवय नाही. लोकांनी तर माझ्या कामावर, माझ्या निधीवर  बदलून स्वतःचे नावं टाकले असेही मला बघायला मिळाले. पण अशा चिल्लर गोष्टी करायची मला गरज, नसून मुंडे साहेबांनी मला अशा चिल्लर गोष्टी कधी शिकवलं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असे चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com