तुमच्या मनातलं आणि पोटातलं बाहेर आलं; दरेकरांचा शरद पवारांवर निशाणा, उद्धव ठाकरेंना नाचवण्याचे...

तुमच्या मनातलं आणि पोटातलं बाहेर आलं; दरेकरांचा शरद पवारांवर निशाणा, उद्धव ठाकरेंना नाचवण्याचे...

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशित होणार आहे

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशित होणार आहे. या पुस्तकात राजकारणाविषयी मोठे खुलासे करण्यात आले आहेत. भाजप आणि शिवसेनेतील वाढलेलं अंतर आमच्यासाठी शुभसंकेत होता, असा दावा शरद पवारांनी या पुस्तकातून केला आहे. यावरुन आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

तुमच्या मनातलं आणि पोटातलं बाहेर आलं; दरेकरांचा शरद पवारांवर निशाणा, उद्धव ठाकरेंना नाचवण्याचे...
उद्धव ठाकरे आजारी असताना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं; नितेश राणेंचा दावा

प्रवीण दरेकर म्हणाले की, या पुस्तकाच्या निमित्ताने राष्ट्रवादी व शरद पवार यांच्या मनामध्ये काय आहे? याचा उहापोह होतो. भाजप व शिवसेनामधील वाढतं अंतर तुम्हाला हवं होतं. शिवसेना व भाजपमध्ये दुरावा व्हावा ही तुमची आंतरिक इच्छा होती. भाजपच्या स्वतःच्या वर्चस्वासाठी हे सगळं करतय असं चित्र तुम्ही निर्माण केलं, पण या निमित्ताने तुमच्या मनातलं आणि पोटातलं बाहेर आलं, असे त्यांनी म्हंटले आहे.

राष्ट्रवादीच्या वर्चस्वासाठी व राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री देण्यासाठी दोही वाढवण्याचा डाव तुम्ही खेळला. आज शिवसेना उद्धव ठाकरेंना नाचवण्याचे काम राष्ट्रवादी करत आहे. तुमचा उद्देश सफल झालेला आहे, अशी टीका दरेकरांनी शरद पवारांवर केली आहे.

तर, पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार असल्याचे विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते. यावरही प्रवीण दरेकर यांनी भाष्य केले आहे. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्याची जयंत पाटलांची इच्छा लपून राहिलेली नाही. उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन तुम्ही काय करणार आहात? काँग्रेसला काय करणार आहात? यामुळे तुमच्या मनातील दावे या निमित्ताने समोर आले आहेत, असेही दरेकर यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com