Babanrao Lonikar | Rahul Gandhi
Babanrao Lonikar | Rahul GandhiTeam Lokshahi

राहुल गांधींवर टीका करताना लोणीकरांची जीभ घसरली; म्हणाले , ५० वर्षांचा या घोडमुंज्याचे

राष्ट्रपुरुषांची बदनामी करणाऱ्या राहुल गांधींना जेलमध्ये डांबले पाहिजे आणि यांची मस्ती आणि माज उतरवला पाहिजे.

महाराष्ट्रात सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेत्तृत्वात भारत जोडो यात्रा सुरु आहे. परंतु, या भारत जोडो यात्रेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र, या यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. वक्तव्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटत आहेत. एकीकडे भाजपकडून राहुल गांधींवर जोरदार टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी राहुल गांधीवर तीव्र शब्दात हल्लाबोल करत, जाणीवपूर्वक राष्ट्रपुरुषांची बदनामी करणाऱ्या राहुल गांधींना जेलमध्ये डांबले पाहिजे आणि यांची मस्ती आणि माज उतरवला पाहिजे, अशा शब्दात विखारी टीका केली आहे.

Babanrao Lonikar | Rahul Gandhi
भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरेंच्या सहभागावर राणेंची बोचरी टीका; म्हणाले, त्यांना वाटलं फोटो येतील....

काय म्हणाले बबनराव लोणीकर?

"काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले राहुल गांधी आणि माजी पंतप्रधानांचा मुलगा, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल एवढं घाणेरडं बोलू कसं शकतो? यांच्या डोक्यावर तर परिणाम तर झालेला नाही? यांनी काही नशा तर केलेली नाही? वारंवार जाणीवपूर्वीक महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत, सावरकरांच्या पावन भूमीत, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमित येऊन बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का? यांचा मेंदू सडला आहे का? जाणीवपूर्वक राष्ट्रपुरुषांची बदनामी करणाऱ्या राहुल गांधींना जेलमध्ये डांबले पाहिजे आणि यांची मस्ती आणि माज उतरवला पाहिजे. अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.

Babanrao Lonikar | Rahul Gandhi
सावरकरांच्या इंग्रजी पत्राचा मुळात राहुल गांधींनी केलेला अनुवादच चुकीचा होता- रणजीत सावरकर

पुढे बोलताना ते म्हणाले की, मी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती केली आहे, की यांना समाजात दुही निर्माण करायची आहे. यांना राजकारण करायचे आहे आणि जाणीवपूर्वक हा घोडमुंजा ५० वर्षांचा या घोडमुंज्याचे लग्नही झालेले नाही. म्हातारा झाला. पण अशा पद्धतीने या वयात ज्येष्ठ, श्रेष्ठ असलेल्या या म्हाताऱ्याने बेताल बडबड करू नये. एवढे जोडे मारले त्यांना महाराष्ट्रात, एवढे खेटरं मारले, की त्यांच्या शंभर पिढ्यात एवढे खेटरं कुणी खाल्ले नसतील. एवढे खेटरं आणि जोडे राहुल गांधी यांनी खाल्ले. त्यांना जेलमध्ये डांबणं आवश्यक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहेत. त्यांचा अभिमान आम्ही कदापीही सहन करणार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि लोकप्रिय गृहमंत्री यांनी राहुल गांधी यांना जेलमध्ये टाकायलाच हवे, अशी मागणीही लोणीकर यांनी केली आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com