राहुल गांधी हे राहुल गंदगी आहेत; भाजप खासदाराची सडकून टीका

राहुल गांधी हे राहुल गंदगी आहेत; भाजप खासदाराची सडकून टीका

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक झाली असून राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढत आहेत.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

सुरज दहाट | अमरावती : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक झाली असून राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढत आहेत. अमरावतीच्या बडनेरामध्येही यात्रा निघाली असता भाजप नेते व राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. राहुल गांधी सावरकर नाहीच तर ते राहुल गंदगी आहे, अशा शब्दात बोंडे यांनी टीका केली आहे.

राहुल गांधी हे राहुल गंदगी आहेत; भाजप खासदाराची सडकून टीका
मच्छर मारायची हिंमत नसलेल्यांनी...; नितेश राणेंचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल, लायकीप्रमाणे बोलायचं

राहुल गांधी सावरकर नाहीच. राहुल गांधी हे राहुल गांधीही नाही. तर राहुल गांधी हे राहुल गंदगी आहेत. ज्यांच्या डोक्यात, मनात तेवढी गंदगी तोच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करू शकतो. ते म्हणजे राहुल गंदगी आहे, अशी टीका अनिल बोंडे यांनी केली आहे. तर, गाढवाला गुळाची चव नसते म्हणून एक नाही, दोन नाही, तीन वेळा स्वातंत्रवीर सावरकर यांचा अपमान राहुल गांधी केला आहे, असं म्हणत बोंडे यांनी राहुल गांधींना गाढवांची उपमा दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com