भाजपचे अजित चव्हाण यांची बुद्धिजीवी प्रकोष्ठ संयोजक पदी निवड

भाजपचे अजित चव्हाण यांची बुद्धिजीवी प्रकोष्ठ संयोजक पदी निवड

भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित चव्हाण यांना नियुक्तीचे पत्र देऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांची बुद्धिजीवी प्रकोष्ठ संयोजक पदी (प्रदेशाध्यक्ष) निवड करण्यात आली आहे. काल भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित चव्हाण यांना नियुक्तीचे पत्र देऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते माधव भांडारी, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजित गोपछडे यावेळी उपस्थित होते.

भाजपचे अजित चव्हाण यांची बुद्धिजीवी प्रकोष्ठ संयोजक पदी निवड
Video : मनोज जरांगे पाटलांना पाहून आई झाली भावूक, म्हणाल्या...

अनेक वर्ष आघाडीच्या वृत्तवाहिन्यांमधून वृत्त निवेदक कार्यकारी संपादक राहिलेल्या पत्रकारिता क्षेत्रात दोन दशकाहुन अधिक काळ आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या अजित चव्हाण यांचा राज्यामधल्या विविध क्षेत्रातील प्रज्ञावंतांशी निकटचा संबंध असल्याने पक्षातील मानाच्या बुद्धिजीवी प्रकोष्ठाच्या प्रदेश संयोजक (प्रदेशाध्यक्ष) पदाची जबाबदारी देण्यात आल्याचे सांगण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित चव्हाण यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com