Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleTeam Lokshahi

कसबा, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी मविआला विनंती करणार : बावनकुळे

कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवडची जागा लढण्याची तयारी महाविकास आघाडीने निवडणूक केली आहे

नागपूर : भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवडची जागा रिक्त झाली आहे. ही जागा लढण्याची तयारी महाविकास आघाडीने निवडणूक केली आहे. परंतु, मविआने निवडणूक न लढवण्याचे आवाहन शिंदे-भाजपकडून करण्यात येत आहे. परंतु, निवडणूक बिनविरोध नाहीच, अशी भूमिका संजय राऊतांनी घेतली आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Chandrashekhar Bawankule
सकाळी 9 वाजता टीव्हीवर साहित्य ओसंडून वाहताना दिसतं; फडणवीसांचा राऊतांना खोचक टोला

कसबा आणि पिंपरी चिंचवड निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मी फोन केले आहे आणि पत्रही पाठविणार आहोत. याआधी आपण असे अनेक उदाहरणं बघितले की ज्यांच्या घरचा व्यक्ती मृत झाला त्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक करण्याचा प्रयत्न करत असतो.

उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांना विनंती करणार की सात-आठ महिन्यासाठी ही निवडणूक लढू नये. मुख्यमंत्री बोलले की नाही हे मला माहित नाही. ही भाजपाची सीट आहे त्यामुळे ती आमची जबाबदारी आहे आणि त्यामुळे यासंदर्भात देवेंद्रजी महाविकास आघाडी सोबत बोलतील, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटले आहे.

सत्यजित तांबे अपक्ष होते म्हणून आम्ही त्यांना मदत केली. भाजपच्या टीमने समर्थन दिला आहे. ते महाविकास आघाडीत असते तर आम्ही त्यांना मदत केली नसती. पण, ते महाविकास आघाडी विरोधात लढले. त्यामुळे आम्ही त्यांना समर्थन दिलं. स्थानिक लेव्हलला समर्थन दिले, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, अमरावती मतदारसंघात मविआ उमेदवार धीरज लिंगाडे यांचा विजय झाला. त्यांनी विद्यमान आमदार रणजित पाटील यांचा पराभव केला. याबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, लिंगाडे हे नशिबाचे धनी आहे. त्यांच्याबद्दल मला जास्त बोलायचं नाहीये. आम्ही त्यांचा अभिनंदन करतो आहे. खरं तर ही निवडणूक आम्ही हरायला नको होतो. मात्र, का हरलो याचा अभ्यास आम्ही करतो आहे. आम्ही हार मान्य केली आहे काय आमचं चुकलं याचा आत्मचिंतन आम्ही करणार, असे त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com