मोदीजी है तो मुमकीन है, हे राऊतांना माहितीयं म्हणूनच...; बावनकुळेंचे प्रत्युत्तर

मोदीजी है तो मुमकीन है, हे राऊतांना माहितीयं म्हणूनच...; बावनकुळेंचे प्रत्युत्तर

संजय राऊतांच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळेंचे उत्तर

चंद्रपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदुहृदयसम्राट आहेत. त्यांना भारतरत्न देऊन केंद्र सरकारने त्यांचा खरा गौरव करावा. आम्ही मागणी केली की यांच्या तोंडाला फेस येतो, असा टोलाही ठाकरे गटाचे नेते संजय राऊत मोदी सरकारला लगावला होता. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते आज ब्रम्हपुरी विधानसभेच्या दौऱ्यावर आहेत.

मोदीजी है तो मुमकीन है, हे राऊतांना माहितीयं म्हणूनच...; बावनकुळेंचे प्रत्युत्तर
मी ईव्हीएमचा फोटो शेअर केला, पण... : रुपाली ठोंबरे पाटील

संजय राऊत यांना माहित आहे की भाजपचं केंद्र आणि राज्य सरकार हे कधीही न होणारे निर्णय घेतं. मोदीजी है तो मुमकीन है, सावरकरांना आम्ही नेहमीच सर्वोच्च मानलं आहे. उलट उद्धव ठाकरे हे सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांसोबत त्यांचा अपमान करण्यात सहभागी झाले आहे, असा निशाणा बावनकुळेंनी राहुल गांधींवरुन उध्दव ठाकरेंवर साधला आहे.

तसेच, कसबा पेठ आणि चिंचवडमध्ये भाजपचे उमेदवार शंभर टक्के विजयी होतील. लोकांच्या मनात केंद्र आणि राज्याची डबल इंजिन सरकार आहे आणि त्यामुळे मतदार विकासाच्या बाजूने मतदान करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

काय म्हणाले होते संजय राऊत?

स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदुहृदयसम्राट आहेत. त्यांना भारतरत्न देऊन केंद्र सरकारने त्यांचा खरा गौरव करावा. आम्ही मागणी केली की यांच्या तोंडाला फेस येतो. देशात क्रांतीची मशाल पेटवणारे ते महान क्रांतिकारक आहेत. सावरकर हे बाळासाहेब ठाकरेंचे प्रेरणास्थान होते. वीर सावरकर यांचा देशात वारंवार अपमान करणाऱ्यांना उत्तर द्यायचं असेल तर त्यांना भारतरत्न देऊन त्यांना सन्मानित करावं, अशी मागणी राऊतांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com