काल एक गोष्ट झाली, अमित भाईंनी दिलेला शब्द पाळला; एकनाथ शिंदेंचा अप्रत्यक्ष खुलासा?

काल एक गोष्ट झाली, अमित भाईंनी दिलेला शब्द पाळला; एकनाथ शिंदेंचा अप्रत्यक्ष खुलासा?

उध्दव ठाकरे यांना मोठा धक्का देत निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला.

पुणे : उध्दव ठाकरे यांना मोठा धक्का देत निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. हा एकनाथ शिंदेंचा मोठा विजय मानण्यात येत आहे. यामुळे शिंदे गटात आनंदाचे वातावरण आहे. अशातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एका कार्यक्रमात केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. काही गोष्टी वेळेवर होतात, कालही एक गोष्ट झाली. गृहमंत्री अमित शहांनी दिलेला शब्द पाळला, असे त्यांनी म्हंटले आहे. यामुळे विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले असल्याची चर्चा आहे.

काल एक गोष्ट झाली, अमित भाईंनी दिलेला शब्द पाळला; एकनाथ शिंदेंचा अप्रत्यक्ष खुलासा?
आता उद्धव ठाकरेंचं नाव घेऊ नका, कोण तो? नारायण राणेंचे टीकास्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित मोदी @२० या पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमात अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित आहेत. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल मी काय बोलू शकतो? आज देशात नाहीतर जगात एक नंबरच नेतृत्व म्हणजे नरेंद्र मोदी आहेत.

मी दाओसला गेल्यावर मला ते दिसले. अनेक जण मोदी यांच्याबद्दल आपुलकीने बोलतात. तेव्हा अनेकजण मला विचारत होते की तुम्ही त्यांच्यासोबत आहे का? तेव्हा आम्ही सोबतच हो असे म्हणालो. राज्यात आणि केंद्रात एकत्र सरकार आहे. सगळ्यांना नाही सांगू शकत राज्यात सरकार कसे स्थापन झाले, असे म्हणताच सभागृहात हशा पिकला.

आपली अर्थव्यवस्था नरेंद्र मोदींनी उंचावर नेली. अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर नेली. जी-20 चे प्रतिनिधीत्व आपण केले ही फार अभिमानाची गोष्ट आहे. नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम केले. म्हणूनच त्यांची कीर्ती जगभर पसरली. त्यांचा पाठिंबा आपल्याला आहे.

बाळासाहेब सांगायचे मला एक दिवस पंतप्रधान बनवा मी 370 हटवतो. 370 हटवण्याचं काम अमित शहांनी केले. कॉंग्रेसच्या काळात त्यांना हे शक्य नव्हते. कारण नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी कलम 370 हटवले म्हणून ते तिरंगा झेंडा फडकवू शकले.

राम मंदिराचे काम लवकरच होईल. म्हणून लोकांच्या मनात जे आहे तेच आम्ही केले. राहुल गांधी काश्मीरात गेले आणि तिरंगा झेंडा फडकवून आले, असे मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे तोंडभरून कौतुक केलं.

काही गोष्टी वेळेवर होतात, कालही एक गोष्ट झाली. अमित भाई दिलेला शब्द पाळतात. दिलेला शब्द त्यांच्यासाठी पत्थर की लकीर असते. मला तसे ते म्हणाले होते आणि त्यांनी आपला शब्द पाळला, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com