एकनाथ शिंदेंच्या जवळचा असल्याचे सांगून 'तो' थेट शिरला अमित शहांच्या ताफ्यात; पोलिसांनी घेतले ताब्यात

एकनाथ शिंदेंच्या जवळचा असल्याचे सांगून 'तो' थेट शिरला अमित शहांच्या ताफ्यात; पोलिसांनी घेतले ताब्यात

गंभीर म्हणजे या व्यक्तीला ‘आयबी’च्या टीमने हेरले आणि काही मिनिटांतच ताब्यात घेतले.

अमोल धर्माधिकारी | पुणे : गृहमंत्री अमित शहा सध्या पुणे दौऱ्यावर असून विविध कार्यक्रम व गाठीभेटी घेत आहेत. अशातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जवळचा माणूस असल्याचे सांगून अमित शहांच्या ताफ्यात एक व्यक्ती शिरला. या व्यक्तीला पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतले आहे. सोमेश धुमाळ असे या संशयितांचे नाव आहे.

एकनाथ शिंदेंच्या जवळचा असल्याचे सांगून 'तो' थेट शिरला अमित शहांच्या ताफ्यात; पोलिसांनी घेतले ताब्यात
आता उद्धव ठाकरेंचं नाव घेऊ नका, कोण तो? नारायण राणेंचे टीकास्त्र

विविध कार्यक्रमानिमित अमित शहा आज पुण्यात आहेत. तेव्हा सोमेश धुमाळ याने आपण एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्याकडे असल्याचे सांगून एका अधिकाऱ्याच्या गेला. स्थानिक पोलिसांना चकवा देणारा सोमेश धुमाळ मात्र शहांसोबत असलेल्या पोलिस यंत्रणेच्या नजरेतून सुटला नाही. या व्यक्तीला आयबीच्या टीमने हेरले आणि त्याचा माग काढत काही मिनिटांतच ताब्यात घेतले. जेडब्ल्यू मॅरेटमधून सोमेशला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी सोमेशला ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले. ही व्यक्ती कोण आहे? ती कोणाच्या वाहनांत बसली, याचा शोध पोलीस घेत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com