Devendra Fadnavis | Uddhav Thackeray | Bhagatsingh Koshyari
Devendra Fadnavis | Uddhav Thackeray | Bhagatsingh KoshyariTeam Lokshahi

उध्दव ठाकरेंचे राज्यपालांना धमकीचे पत्र! उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यपाल जे बोलले ते योग्य...

तिन्ही पक्षाचे नेते राज्यापालांना भेटायला गेले होते. त्यावर राज्यपालांनी त्यांना सांगितले. की, अशा प्रकारे धमकीच्या पत्रावर राज्यपाल कधीच कारवाई करत नाहीत.
Published by :
Sagar Pradhan

आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत राहिलेले माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आता राज्यपाल पदातून पदमुक्त झाले आहे. परंतु, वादग्रस्त विधानांसह त्यांचा आणि तत्कालीन माविआ सरकार सोबत देखील संघर्ष पाहायला मिळाला. महाविकास आघाडी सरकारने 12 आमदारांच्या नावाची यादी देऊनही कोश्यारी यांनी मान्यता दिली नव्हती. मात्र, यावर आता पदमुक्त झाल्यावर त्यांनी भाष्य केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी मला उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल नियुक्त करण्यासाठी पत्रात धमकी दिली होती, असा दावा केला आहे. याच प्रकरणावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis | Uddhav Thackeray | Bhagatsingh Koshyari
ठाकरे गटाला एकामागोमाग एक धक्के; संसदेतील शिवसेना कार्यालयही शिंदे गटाकडे

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

पुण्यात माध्यमांशी बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले असता त्यावर बोलताना ते म्हणाले की, राज्यपालांना अजित पवार यांनी पत्र लिहिले नव्हते. ते पत्र उद्धव ठाकरेंनी लिहले आहे. आता मी पूर्ण मुलाखत पहिली नाही पण राज्यपाल जे बोलले ते योग्य आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुढे त्यांना माध्यमांकडून या धमकीच्या पत्राबाबत माहिती होत का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, मला जी माहिती मिळालेल्या, त्यानंतर तिन्ही पक्षाचे नेते राज्यापालांना भेटायला गेले होते. त्यावर राज्यपालांनी त्यांना सांगितले. की, अशा प्रकारे धमकीच्या पत्रावर राज्यपाल कधीच कारवाई करत नाहीत. योग्य फॉरमॅटमध्ये पत्र पाठवा, मात्र, उद्धव ठाकरेंचा यामध्ये इगो होता. त्यामुळे त्यांनी पत्राचा फॉरमॅट बदलला नव्हता. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com