आदित्य ठाकरेंना भेटायला बॉडीगार्डचे पाय धरावे लागायचे...; दीपक केसरकरांनी सर्वच सांगितले

आदित्य ठाकरेंना भेटायला बॉडीगार्डचे पाय धरावे लागायचे...; दीपक केसरकरांनी सर्वच सांगितले

दीपक केसरकरांचे आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ४०० किमी सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्यांची घोषणा केली होती. मात्र, ही कामं अद्यापही सुरू झाली नसून या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. यावर शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आतापर्यंत कंत्राटदारांच्या बैठका या मातोश्रीवर व्हायच्या. केसरकरांनी सात वर्षापुर्वीची घटना सांगितली आहे.

आदित्य ठाकरेंना भेटायला बॉडीगार्डचे पाय धरावे लागायचे...; दीपक केसरकरांनी सर्वच सांगितले
अतिक अहमद 'शहीद'; काँग्रेस नेत्याची 'भारतरत्न' देण्याची मागणी

आतापर्यंत कंत्राटदारांच्या बैठका या मातोश्रीवर व्हायच्या. तुमच्यासाठी मुंबई कंत्राटाची खाण असेल. मेट्रोचे काम कोणामुळे बंद पडले हे जगजाहीर आहे. तुम्ही पर्यावरण मंत्री असताना हजारो कोटीचे स्टुडिओ सीआरझेड मध्ये कसे उभे राहिले, असे प्रश्न दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंना विचारला आहे.

जर्मन कंपनीच्या व्यक्तीला मी मातोश्रीवर घेऊन गेलो होतो. उद्धव ठाकरे यांनी मला सांगितलं की या माणसाला घेऊन बीएमसी मध्ये घेऊन जा. मी घेऊन गेलो तेव्हा असं सांगण्यात आलं की आमच्या माणसाला कंत्राट द्या असं सांगण्यात आलं. हे 7 वर्षांपूर्वीचं आहे. जर्मन कंपनी सोबत त्यांचे कंत्राटदार आहेत त्यांना काम मिळायला हवं असं सांगण्यात आलं. हे मी अनुभवलं आहे, असा किस्साही केसरकर यांनी सांगितला आहे.

वरळी मतदारसंघात काय केलं तुम्ही? कोळी बांधवांना आम्ही न्याय दिला. मुंबईमध्ये मेट्रोचे काम फडणवीस यांनी आणलं, एकनाथ शिंदे यांनी ते काम पुढे नेलं. मुंबईचा विकास काय केला तुम्ही? ४ डेक बांधले म्हणजे विकास झाला का? खोके मागायची सवय तुम्हाला आहे हे मी जाहीरपणे सांगतो, अशी टीका त्यांनी केली आहे.

मी एक ज्येष्ठ आमदार आहे, पण मला आदित्य ठाकरे यांना भेटायला त्यांच्या बॉडीगार्डचे पाय धरावे लागायचे. बॉडीगार्ड सांगायचे मुंबईत आहेत की बाहेर आहेत. आदित्य ठाकरे यांनी आता सीमा ओलांडल्या आहेत त्यामुळे मला बोलावं लागतं. नाहीतर मी कधीच ठाकरे परिवारावर बोललं नाही. तुम्ही असंच बोलत जाणार असाल तर तुम्ही अधिक खोलात जाल, असा इशाराही दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंना दिला आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करप्ट मॅन असा उल्लेख केला. यावर करप्ट मॅन बघायचं असेल तर त्यांनी स्वतःला आरशात बघावं, असा टोला केसरकरांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com