तारीख पे तारीख न्याय मिळत नव्हता, पण आता...; फडणवीसांनी मानले शहांचे आभार
कल्पना नळसकर | नागपूर : गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत तीन विधेयके मांडली. यामध्ये भारतीय नागरी संरक्षण संहिता 2023, भारतीय न्याय संहिता 2023 आणि भारतीय पुरावा विधेयक 2023 यांचा समावेश आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेक वर्षानंतर इंग्रजांनी तयार केलेले कायदे बदल असल्याचा आनंद आहेत, असे म्हणत फडणवीसांनी आभार मानले.
अनेक वर्षानंतर इंग्रजांनी तयार केलेले कायदे बदल असल्याचा आनंद आहेत. मुळात इंग्रजांनी जे कायदे तयार केले होते ते भारतीयांना दाबून ठेवत राज्य करण्यासाठी कायदे केले होते. अनेक वर्षापासून बदल करण्याची मागणी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे मनापासून आभार मानतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.
या कायद्यांमध्ये लोकशाही अनुरूप हे कायदे तयार केले आहेत. त्यासोबत नवीन युगाच्या आव्हानांना सामना करण्यासाठी हे कायदे तयार केले आहेत. आपल्या देशातील क्रिमिनल जस्टिस सिस्टीम वेळकाढूपणाची आहे. तारीख पे तारीख न्याय मिळत नव्हता, अशी ओरड होत होती. त्याला सुद्धा उत्तरदायी करण्याचे काम कायद्यामुळे होणार आहे. स्वागतहार्य अशा प्रकारचा हा बदल आहे. कायद्यातील नवीन बदल्यामुळे दोष सिद्धीचे प्रमाण हे 90 टक्क्यांपर्यंत जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच सर्वांना शुभेच्छा देतो. सर्वत्र स्वातंत्र्य दिवस अतिशय उत्साहात साजरा होईल. घरघर तिरंगा मागील वर्षीपासून उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. उद्या गडचिरोलीत अनेक कार्यक्रम स्वतः घेतलेले आहे. दुर्गम भागात मी जाणार असून पोलिसांसोबत त्या ठिकाणी स्वतंत्रता दिवस साजरा करणार आहे, असेही फडणवीसांनी सांगितले आहे.