RBI withdraws 2000 note: काळा पैसा जमा करून ठेवला असेल तर...; फडणवीसांचे विरोधकांना प्रत्युत्तर

RBI withdraws 2000 note: काळा पैसा जमा करून ठेवला असेल तर...; फडणवीसांचे विरोधकांना प्रत्युत्तर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढणार आहे. यावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

कल्पना नलसकर | नागपूर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढणार आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2 हजारांच्या नोटा बँकेतून बदलून घेता येणार आहेत. या निर्णयावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 2 हजारची नोटेला काय आताच अवैध ठरवलेलं नाहीये. कोणी काळा पैसा जमा करून ठेवला असेल तर त्याला नक्कीच त्रास होणार असल्याचे फडणवीसांनी म्हंटले आहे.

RBI withdraws 2000 note: काळा पैसा जमा करून ठेवला असेल तर...; फडणवीसांचे विरोधकांना प्रत्युत्तर
फडणवीसांच्या भेटीवर आशिष देशमुखांची प्रतिक्रिया; कालचे विरोधक, आज मित्र....

2 हजारची नोट ही सर्क्युलेशन मधूनं बाहेर काढण्याचा निर्णय झालाय. त्याला काय आता अवैध ठरवलेलं नाहीये. तर सप्टेंबरपर्यंत ही सर्क्युलेशन मधूनं बाहेर काढायची आहे. त्यांना सप्टेंबरपर्यंत या नोटा तुम्हाला बदलता येतील. त्यामुळे ज्यांच्याकडे कायदेशीर नोटा असतील त्यांच्याकडे पांढरा पैसा असेल. अशा कोणालाही चिंता करण्याची गरज नाही. कोणी काळा पैसा जर जमा करून ठेवला असेल तर त्याला बदलताना त्रास नक्कीच होणार आहे. कारण शेवटी त्याला सांगावं लागणार आहे की इतक्या नोटा आल्या कुठून? असे देवेंद्र फडणवीसांनी म्हंटले आहे.

सगळ्यात महत्त्वाचं आहे की 2 हजारांच्या नोटा किंवा अशा कुठल्याही नोटा बदलल्यानंतर त्याचा सगळ्यात मोठा फायदा मागील नोटबंदीनंतर आपल्या लक्षात आला. ज्या बनावट नोटा करन्सी आपल्याकडे पुश करण्याचा प्रयत्न आयएसआय सारख्या संघटनांच्या माध्यमातून होतो तो पूर्ण उधळला जातो. आणि मला असं वाटतं की या निर्णयामुळे एकीकडे जो फेक करन्सी पुश करण्याचा प्रयत्न होतो. त्याच्यावर आळा बसेल, असेही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस पक्षातून निलंबित नेते आशिष देशमुख यांची त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यावरही फडणवीसांनी भाष्य केले आहे. आशिष देशमुख यांनी बऱ्याच दिवसापासून मला नाश्त्याला बोलावलं होतं. त्यामुळे नाश्ता करायला गेलो होतो. नागपूरचा डोसा चांगला की मुंबईचा डोसा चांगला? यावरती चर्चा झालेली आहे. त्यामुळे तुम्ही शेवटचा टोक गाठू नका, असं गंमतीशीर उत्तर त्यांनी दिलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com