राज्यात काही विघ्नसंतोषी लोक; फडणवीसांचा रोख कुणाकडे?

राज्यात काही विघ्नसंतोषी लोक; फडणवीसांचा रोख कुणाकडे?

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फडणवीस बोलत होते.

मुंबई : आपल्या राज्यात काही विघ्नसंतोषी लोक आहेत. जे शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्तही वाद निर्माण करतात. एका महाभागाने हा ३५०वा शिवराज्याभिषेक सोहळा नाहीच, असा प्रश्न उपस्थित केला. त्याचे उत्तर शरद पवार यांनी दिले. त्या ट्वीटला हॅशटॅग आहे. ज्यामुळे ज्यांनी हा प्रश्न विचारला होता ते पुन्हा विचारणार नाहीत, असा जोरदार टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

राज्यात काही विघ्नसंतोषी लोक; फडणवीसांचा रोख कुणाकडे?
....तर मी राजकारण सोडेन; 'त्या' आरोपांवर अजित पवारांचे प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण युगपुरुष मानतो. ज्या कालखंडात देशात अंधकार होता. तेव्हा राजे व महान राजे अनेक झाले. पण, छत्रपतींचे वेगळेपण काय? तर मुघलांचे मांडलिक म्हणून अनेक राजे काम करण्यास तयार होते. छत्रपतींसमोर हा पर्याय होता. परकीयांसाठी मांडलिक स्वीकारण्यापेक्षा स्वकियांसाठी मरण पत्करले तर चालेल, जिजाऊंचा हा विचार होता.

ज्यांच्या मनात पराभवाची मानसिकता तयार झाली होती. आमची मंदिर उध्वस्त करून आमचे ईश्वर हा आपल्याला वाचवू शकत नाही असे वातावरण तयार केले होते. त्या वातावरणात मुघल साम्राज्य उद्ध्वस्त करण्याची ताकद तुमच्यात आहे हे मावळ्यांमध्ये तयार करण्याचे काम छत्रपतींनी केले, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, त्यानंतर मराठी माणूस थांबला नाही. छत्रपती संभाजी महाराज व अनेक जण तयार झाले. ते झुंजत राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी माणसाच्या मनामनात बीजारोपण केले. त्यामुळे देशात हिंदवी व मराठी साम्राज्य पाहायला मिळते. आज देशात महाराष्ट्र प्रगत का? पुढारलेला का आहे? तर छत्रपतींनी केलेले बीजारोपण आपल्या मनामनात आहे. म्हणूनच दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा.

महाराष्ट्र व देशाला ऊर्जा व शक्ती हे महाराजांचे विचार देतात. शिवराज्याभिषेक दिवस साजरा करून थांबणार नाही. नारीचे रक्षण करून सामान्यांना सु़खाचे दिवस येण्यासाठी रयतेचे राज्य येण्यासाठी काम करत राहू, असा निर्धारही देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com