अजित पवारांना फडणवीसांचे उत्तर; पोलीस फडणवीसांचे नाही तर महाराष्ट्राचे

अजित पवारांना फडणवीसांचे उत्तर; पोलीस फडणवीसांचे नाही तर महाराष्ट्राचे

पत्रकार शशिकांत वारिसे हत्येप्रकरणी देवेंद्र फडणवीसांचे उत्तर

मुंबई : राज्यात रिफायनरी विरोधात लिखाण केले म्हणून कोकणातील पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या करण्यात आली, ही पुरोगामी महाराष्‍ट्रासाठी लाजिरवाणी घटना आहे. वारिसे यांची हत्या करणारा संशयित आरोपी हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांचे फोटो वापरुन रिफायनरीचे समर्थन करत होता. ही गंभीर बाब आहे. या हत्येच्या मागचा मास्टरमाईंड शोधण्याची आक्रमक मागणी विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.

अजित पवारांना फडणवीसांचे उत्तर; पोलीस फडणवीसांचे नाही तर महाराष्ट्राचे
शशिकांत वारिसे हत्येचा मास्टरमाईंड शोधा, पोलिसांना ‘फ्री हॅण्ड’ दया; अजित पवार सभागृहात आक्रमक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २५ लाखांची मदत जाहीर केली आहे. वारिसे प्रकरणी कोणत्याही तपास अधिकाऱ्यांवर दबाव राहणार नाही. पोलीस महासंचालक यांना सांगेल, कुणीही दबावात काम करू नका. त्यात कुणाचा संबंध नाही. तपास झाल्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी घेण्यास सांगणार असून लवकर निकाल लागेल याची काळजी घेऊ, असे फडणवीसांनी म्हंटले आहे.

आशियातील सर्वात मोठी रिफायनरी कोकणात उभारली जाणार आहे. केंद्र सरकारच्या तीन कंपन्या यात गुंतवणूक करणार आहेत. जामनगरमधील रिफायनरीमुळे गुजरात अर्थव्यवस्था चालते. कोकणात रिफायनरी करताना सर्वांना विचारात घेणार आहेत. राज्याच्या हिताची रिफायनरी आहे. त्यामुळे त्याचा पाठपुरावा घेणार आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली.

पोलीस फडणवीसांचे नाही तर महाराष्ट्राचे पोलीस आहेत. मागच्या काळातील ५० अशा घटना सांगेल. पण, तसे होऊ नये म्हणून कायदा केला आहे. अधिक कडक कारवाई करायची असेल तर कायद्यात बदल केला जाईल. पोलीस अधिक सक्षमपणे काम करत आहेत. कुठे चुकले तर लक्ष दिले जाईल, असेही फडणवीसांनी सांगितले आहे.

दरम्यान, राज्यात पत्रकारांवर झालेला हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला असून पत्रकार वारिसे यांच्या हत्येच्या मागचा मास्टरमाईंड शोधण्याची मागणी विधान सभेचे अजित पवार यांनी सभागृहात केली. ते म्हणाले, कोकणात रिफायनरी विरोधात लिखाण करणारे पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या गाडीला अपघात करुन त्यांना फरफटत नेले. पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना आहे. या हत्येतील संशयित आरोपी हा रिफायनरीचा समर्थक आहे. त्याने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांचे फोटो वापरुन रिफायनरीच्या जाहिराती केल्या आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे या हत्येचा तपास करणाऱ्या पोलिसांवर दबाव येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पोलिसांना तपासात ‘फ्री हॅण्ड’ देण्यात यावा. या तपासात राजकीय हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घ्यावी, असे अजित पवारांनी म्हंटले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com