कारसेवकांच्या वादावर फडणवीसांकडून ठाकरे गटाला प्रत्युत्तर; 'तो' फोटो ट्विट

कारसेवकांच्या वादावर फडणवीसांकडून ठाकरे गटाला प्रत्युत्तर; 'तो' फोटो ट्विट

आपणही अयोध्येला कारसेवेसाठी गेलो होतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. यावरुन विरोधकांनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडत पुरावा मागितला होता.

मुंबई : आपणही अयोध्येला कारसेवेसाठी गेलो होतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. यावरुन विरोधकांनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडत पुरावा मागितला होता. आता देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर कासेवा करतानाचा एक फोटो शेअर केला आहे.

कारसेवकांच्या वादावर फडणवीसांकडून ठाकरे गटाला प्रत्युत्तर; 'तो' फोटो ट्विट
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस-पवार अयोध्येला जाणार नाहीत? काय कारण

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जुनी आठवण, नागपूरहून प्रकाशित होणार्‍या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्‍या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र. छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत प्रभूश्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे. नवभारत परिवाराचा मी अतिशय आभारी आहे, असे त्यांनी ट्विटरवर म्हंटले आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

पहिल्या कारसेवेच्या वेळी मी स्वतः गेलो होतो. अयोध्येतून रामजन्मभूमीच्या ठिकाणी पायी चालत जात असताना आमच्यावर लाठीचार्ज झाला. बदायू येथील केंद्रीय कारागृहात मी १७ ते १८ दिवस काढले. त्यानंतर १९९२ साली मी पुन्हा अयोध्येत गेलो होतो. बाबरीचा ढाचा पाडला, तेव्हा मीही तेथे होतो. तसेच राम मंदिरासाठी बदायूच्या सेंट्रल जेलमध्ये मी कारावास भोगला. बाबरी पाडली, त्याबद्दल ज्या ३२ जणांना आरोपी केले होते, त्यात महाराष्ट्रातील शिवसेनेच्या एकाही नेत्याचा समावेश नाही, ते सर्व भाजपचे नेते होते, असेही फडणवीसांनी सांगितले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com