Hasan Mushrif
Hasan MushrifTeam Lokshahi

ईडी कारवाईविरोधात बँक लढा देईल : हसन मुश्रीफ

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा मध्यवर्ती बँकेत ईडीने पुन्हा एकदा चौकशीला सुरुवात केली आहे.

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखालील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत ईडीने पुन्हा एकदा चौकशीला सुरुवात केली आहे. तब्बल 30 तासानंतर ईडीचे अधिकाऱ्यांनी चौकशी केली असून काही कागदपत्रे घेऊन गेले आहेत. यावर हसन मुश्रीफांनी प्रतिक्रिया दिली आहे. बँकेत घोटाळा झाला तर चौकशी होते. मात्र, घोटाळा नसताना ईडी का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Hasan Mushrif
Nagpur MLC Election Result : नाना पटोलेंनी हुरळून जाऊ नये : बावनकुळे

राज्य सहकारी बँक, नाबार्ड, सहकार आयुक्त यांचे ऑडिट रिपोर्ट आमच्याकडे आहेत. बँकेत घोटाळा झाला तर चौकशी होते. मात्र, घोटाळा नसताना ईडी का? 30 तास तपास झाला काहीही मिळाले नाही. या कारवाई विरोधात बँक लढा देईल. बँकेने कोणतेही बेकायदेशीर कर्ज दिलेले नाही. ईडी का आली हे वेगळे सांगण्याची गरज नाही, असा निशाणा त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर साधणार आहे.

आमच्या पाच अधिकाऱ्यांना चौकशीसाठी घेऊन गेले आहे. गेले 30 तास त्यांची चौकशी सुरू होती. काही कागदपत्रेही घेऊन गेले आहेत. कर्मचाऱ्यांना त्यांच्या नातेवाईकांनाही भेटू दिलेले नाही, अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

दरम्यान, आमदार हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील निवासस्थानी, सेनापती कापसी येथील साखर कारखाना व मुलीच्या घरी ११ जानेवारी रोजी 'ईडी'ने छापे टाकले होते.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com