स्व.गोपीनाथ मुंडेंसारखाच त्रास पंकजांना देणे सुरुयं; खडसेंनी सगळंच सांगितलं

स्व.गोपीनाथ मुंडेंसारखाच त्रास पंकजांना देणे सुरुयं; खडसेंनी सगळंच सांगितलं

स्व.गोपीनाथ मुंडेंबाबत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा मोठा गौप्यस्फोट

जळगाव : स्व.गोपीनाथ मुंडेंना भाजपमध्ये त्रास देण्यात आलं. तसाच प्रकार आता पंकजा मुंडे यांच्याबाबतीत सुरू आहे, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. जळगावात ते माध्यमांशी बोलत होते. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना मंत्रिपद देण्यासाठी सकाळी चार वाजेपर्यंत त्यांना वाट बघावी लागली होती. मी त्यांच्या सोबत हजर होतो, असेही त्यांनी म्हंटले आहे.

स्व.गोपीनाथ मुंडेंसारखाच त्रास पंकजांना देणे सुरुयं; खडसेंनी सगळंच सांगितलं
'नागपूर टू दादर अकेला गुलाबराव फादर'; पाटलांचे वक्तव्य चर्चेत

स्व.गोपीनाथ मुंडेंना हयात असतांना भाजपमध्ये त्रास देण्यात आलं हे मला माहित आहे. अगदी केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना मंत्रिपद देण्यासाठी सकाळी चार वाजेपर्यंत त्यांना वाट बघावी लागली होती. मी त्यांच्या सोबत हजर होतो. मधील कालखंडात जितकी छळवणूक झाली. त्यांना शेवटी पक्ष सोडण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये आला होता. पक्ष सोडून द्यावा, अशी स्तिथी त्यांच्या मनामध्ये आली होती. तोच प्रकार आता पंकजा मुंडेंबाबतीत सुरू आहे. मला वाटत ओबीसींवर अन्याय करण्याची भूमिका सातत्याने घेतली गेली. परंतु, त्याठिकाणी ओबीसींनीच मदत केली आणि थोडा फार अन्याय झाला. तो आम्ही सहन केला, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे.

भाजपने नेहमीच ओबीसींची अवेहलना केली. हेळसांड केली आहे. हे एका उदाहरणावरून नाहीये तर अगदी अण्णासाहेब, फरांदे, भाऊसाहेब फुंडकर होते. यानंतरच्या कालखंडात एकनाथ खडसे आहेत. पंकजा मुंडे आहेत. स्व.गोपीनाथ मुंडे आहे, असा आरोप देखील एकनाथ खडसे यांनी केला आहे. आता यावर भाजप काय प्रतिक्रिया देणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

दरम्यान, पंकजा मुंडेंनी अनेकदा जाहीरपणे भाजपवर आपली नाराजी बोलून दाखवली आहे. यामुळे अनेकदा त्यांच्या भाजप सोडण्याच्या चर्चांही राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. परंतु, पंकजा मुंडेंनी या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. अशातच, एकनाथ खडसेंनी गौप्यस्फोट केल्यामुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडे भाजप सोडणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com