बाहेर देशातून फडणवीस कांद्याचे भाव ठरवतात, मग इकडे राष्ट्रवादीचे कृषिमंत्री... : खडसे

बाहेर देशातून फडणवीस कांद्याचे भाव ठरवतात, मग इकडे राष्ट्रवादीचे कृषिमंत्री... : खडसे

केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा 2410 रुपये प्रतिक्विंटल भावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. यावर एकनाथ खडसे यांनी टीकास्त्र डागले.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

जळगाव : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क आकारण्याचा निर्णयाविरोधात ठिकठिकणी शेतकरी आंदोलन करत आहेत. अशातच, केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा 2410 रुपये प्रतिक्विंटल भावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी अजित पवार गट आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

बाहेर देशातून फडणवीस कांद्याचे भाव ठरवतात, मग इकडे राष्ट्रवादीचे कृषिमंत्री... : खडसे
चांद्रयान मोहिमेत महाराष्ट्राचा मोलाचा वाटा! सांगोलाच्या तरुणाचं मोठे योगदान

कांद्यावर कोटी कुघोडीचे राजकारण करावे. सर्व जण एकमेकांच्या कुरघोड्या करण्यामध्ये व्यस्त आहे. राष्ट्रवादीचे कृषिमंत्री घोषणा करू शकत नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली नाही आणि देवेंद्र फडणवीस यांनी थेट जपानमधून कांद्याबाबत घोषणा केली, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादीचे कृषिमंत्री असले मुख्यमंत्री शिवसेनेचे असले तरी त्या दोघांना काहीच किंमत नाही. देवेंद्र फडणवीस हेच वरचढ आहेत. फडणवीस यांनी घोषणा केल्यावर ती मान्य करावीच लागेल अशी एकनाथ शिंदे यांची मजबुरी आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार थेट मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारतात. बाहेर देशात असताना देवेंद्र फडणवीस कांद्याचे भाव ठरवतात. मग इकडे राष्ट्रवादीच्या कृषी मंत्र्याला शून्य किंमत आहे. जनतेशी यांना काही घेणं देणं नाही, असा निशाणाही त्यांनी साधला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील. तसेच 2 हजार 410 प्रतिक्विंटल या दराने कांद्याची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन दिली होती.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com