अयोध्येत शिंदे-फडणवीस श्रीरामाच्या चरणी लीन; राम मंदिराला धनुष्यबाण भेट

अयोध्येत शिंदे-फडणवीस श्रीरामाच्या चरणी लीन; राम मंदिराला धनुष्यबाण भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अयोध्या दौऱ्यावर आहेत.

लखनऊ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. अयोध्येत शिंदे-फडणवीस श्रीरामाच्या चरणी लीन झाले. यावेळी एकनाथ शिंदेंकडून राम मंदिराला धनुष्यबाण भेट देण्यात आला. तसेच, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून नव्याने तयार होत असलेल्या राम मंदिराच्या परिसराला भेट देत पाहणी केली.

अयोध्येत शिंदे-फडणवीस श्रीरामाच्या चरणी लीन; राम मंदिराला धनुष्यबाण भेट
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून सरकार धर्माच्या नावावर पर्यटनाला गेले; राऊतांचे टीकास्त्र

एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीसांनी रामलल्लाचं दर्श घेतले आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत नव्याने तयार होत असलेल्या राम मंदिराच्या परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी राम मंदिराच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली तसेच त्याची स्थापत्य वैशिष्ट्ये जाणून घेतली. यावेळी एकनाथ शिंदेंकडून राम मंदिराला धनुष्यबाण भेट देण्यात आला. सोबतच, शिंदे-फडणवीसांनी हनुमान गढीचंही दर्शन घेतले. दरम्यान, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री संध्याकाळी शरयु तीरावर आरती करणार आहेत.

यावेळी ज्येष्ठ शिवसेना नेते रामदास कदम, ज्येष्ठ शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार मंगेश चव्हाण, रामजन्मभूमी तीर्थस्थानचे महासचिव चंपत राय आणि अयोध्येतील महंत उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com