चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून उध्दव ठाकरेंचा राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न; शिंदेंची टीका

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून उध्दव ठाकरेंचा राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न; शिंदेंची टीका

धाराशिवमध्ये एकनाथ शिंदेंनी अवकाळी नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

बालाजी सुरवसे | धाराशिव : चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न उध्दव ठाकरे करत असल्याची निशाणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला आहे. धाराशिवमध्ये एकनाथ शिंदेंनी अवकाळी नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या तत्व 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारणाला उध्दव ठाकरेंकडून हारताळ फासले जात असल्याची टीकादेखील मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून उध्दव ठाकरेंचा राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न; शिंदेंची टीका
चंद्रकांत पाटलांचा राजीनामा मागायची तुमच्यात हिम्मत आहे का? राऊतांचे टीकास्त्र

बाळासाहेब ठाकरे यांचे 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण तत्व होते. त्या तत्वालाच उध्दव ठाकरेंनी हरताळ फासत 100 टक्के राजकारण करत असल्याची टीका एकनाथ शिंदेंनी केली आहे. पत्रकारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रश्न विचारला असता ते हात जोडून निघून जातात. यावरून शेतकऱ्यांसंबधी त्यांना किती कळवळा आहे हे दिसून येते. तसेच, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न उध्दव ठाकरे करत असल्याचा निशाणाही त्यांनी साधला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री फक्त फोटो सेशन करण्यासाठी दौरा करतात, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. त्याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी घरी बसून आदेश देत नाही. तर शेतकऱ्यांच्या शेतात येऊन पाहणी करतो. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन शेतकऱ्यांसोबत फोटो काढून दाखवावे, असे आव्हानदेखील एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरे यांना दिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com