Eknath shinde
Eknath shindeTeam Lokshahi

सहामाही परीक्षेत आम्ही पास झालो, आता वार्षिक परीक्षेत...: एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२३ उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२३ उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. सरकारला 6 महिने पूर्ण झाले असून आम्ही सहामाही परीक्षेत पास झालो आता वार्षिक परीक्षेत देशात एक नंबर येणार असल्याचा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला आहे.

Eknath shinde
आपल्याकडे एक सीएम आणि दुसरे सुपर सीएम; आदित्य ठाकरेंचा खोचक टोला

एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यातील सर्वात मोठे एक्स्पो मराठवाड्यात केले. या प्रदर्शनामुळे स्थानिक उद्योगांना देशात आणि देशाबाहेर मदत होईल. उद्योग वाढवा आणि योद्योजक वाढावेत ही सरकारची योजना आहे. आम्ही 70 हजार कोटी रुपयांच्या उद्योगांना कॅबिनेट मध्ये मान्यता दिली आहे. सरकारला 6 महिने पूर्ण झाले असून आम्ही सहामाही परीक्षेत पास झालो आता वार्षिक परीक्षेत देशात एक नंबर आपले सरकार येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आम्ही सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री लोकांमध्ये गेला पाहिजे. समोरच्या लोकांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेणे ही माझी आवड आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

उद्योग क्षेत्रात शेतकऱ्यांची भूमिका महत्वाची आहे. परवानग्या आणि परवाने प्रोसेस कमी करणे यासाठी प्रयत्न करत आहे. आपलं राज्य पायाभूत सुविधा मध्ये अव्वल दर्जेचे आहे. याच उदाहरण समृद्धी महामार्ग आहे. 18 ते 20 तासाचे अंतर 6 ते 8 तासांवर आणले.समृद्धी महामार्ग हा गेम चेंजर प्रकल्प आहे. औरीक हे भारतातील पाहिले नियोजनबद्ध शहर म्हणून नावारूपाला येत आहे. जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू आहे,मुंबई येथे बैठक झाली असून औरंगाबाद येथे पण बैठक होतील. जी-20 मुळे जगभरातील लोकांना आपलं उद्योग क्षेत्र दाखवण्याची ही संधी आहे, असेही त्यांनी सांगतिले.

Eknath shinde
शरद पवारांनी एवढी वर्षे राजकारण केलं, तरी त्यांचं बारामती होऊ शकलं नाही, - जितेंद्र आव्हाड

गावात रोजगार उपलब्ध झाल्यास तरुण रोजगारासाठी बाहेर जाणार नाही. ग्रामीण उद्योगाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्याला केंद्रच पाठबळ मिळाले असून मिळालेल्या संधीचे सोने करायला हवे. या राज्यातील वातावरण बदलले, आपले राज्य इंडस्ट्री फ्रेंडली राज्य आहे. उद्योग हा विकासाचा पाया असून तो मजबूत होण्यासाठी सरकारचा प्रयत्न आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com