मुंब्रामध्ये काही फुसके बार येऊन गेले; शिंदेंची जोरदार टोलेबाजी

मुंब्रामध्ये काही फुसके बार येऊन गेले; शिंदेंची जोरदार टोलेबाजी

शिवसेनेची मुंब्रा येथील शाखा शिंदे गटाकडून पाडण्यात आल्यानं मोठा वाद निर्माण झाला. शिवसेनेची मुंब्रा येथील शाखा शिंदे गटाकडून पाडण्यात आल्यानं मोठा वाद निर्माण झाला.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

ठाणे : शिवसेनेची मुंब्रा येथील शाखा शिंदे गटाकडून पाडण्यात आल्यानं मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी मुंब्य्रातील शिवसेना शाखेला भेट दिली. यावेळी ठाकरे आणि शिंदे गटात प्रचंड राडा देखील पहायला मिळाला. यावरुन उध्दव ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. या टीकेला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंब्रामध्ये काही फुसके बार येऊन गेले; शिंदेंची जोरदार टोलेबाजी
मुंब्र्यातून परतल्यानंतर ठाकरेंचा शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल

एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंब्रामध्ये काही फुसके बार येऊन गेले. आमचे नरेश म्हस्के आणि महिला आघाडीने असे जोरदार फटाके फोडले की फुसके बार यु टर्न घेऊन निघून गेले, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. फुसके बार वाजलेच नाही. हा दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे जे पेरलं तेच उगवणार, असेही एकनाथ शिंदेंनी म्हंटले आहे.

काय म्हणाले होते उध्दव ठाकरे?

आज मी मुद्दाम आलो. हे नेभळट आहेत. चोर व गद्दार तर आहेत. पण नामर्द पण आहेत. शिवसेनेची शाखा वर्षानुवर्षे आहे व होती. आज डबडे आणून ठेवले आहे. आमच्याकडेही कागदपत्रे आहेत. हे घुसखोरी करत आहेत. नोटीस शिवाय हे कार्यालय पाडू शकत नाही. ही शाखा कुणी पाडली. प्रशासनाने नव्हे तर त्यांनी पाडली. हा जुलूम जबरदस्तीचा प्रकार सुरु आहे. पोलिसांकडून त्यांचे रक्षण व आमच्यावर दंडुका चालणार असतील तर चालणार नाही. चोर म्हणून जो शिक्का लागला तो त्यांना पुसता येणार नाही, अशी टीटा उध्दव ठाकरेंनी केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com