मुंब्र्यातून परतल्यानंतर ठाकरेंचा शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल
शिवसेनेची मुब्रा इथली शाखा शिंदे गटाकडून पाडण्यात आल्यानं मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर आज उद्धवठाकरे यांनी मुंब्य्रातील शिवसेना शाखेला भेट दिली. यावेळी ठाकरे आणि शिंदे गटात प्रचंड राडा देखील पहायला मिळाला. त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी ठाकरेंना शाखेजवळ जाऊ दिलं नाही. ठाकरे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी तेथून परत फिरले. मुंब्य्रातून परत आल्यानंतर ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केलाय.
यावेळी ते म्हणाले की, पोलिसांची हतबलता आज पाहिली. याच सरकारने पोलिसांना वारकरी, मराठा आंदोलकांवर पाशवी लाठीहल्ला करायला लावला होता. आज चोरांचे रक्षण करायला लावले.
मी समजू शकतो. अशी नामुष्की यापूर्वी कधीही महाराष्ट्र दिसली नाही. आज मी मुद्दाम आलो. हे नेभळट आहेत. चोर व गद्दार तर आहेत. पण नामर्द पण आहेत.
शिवसेनेची शाखा वर्षानुवर्षे आहे व होती. आज डबडे आणून ठेवले आहे. आमच्याकडेही कागदपत्रे आहेत. हे घुसखोरी करत आहेत. नोटीस शिवाय हे कार्यालय पाडू शकत नाही. ही शाखा कुणी पाडली. प्रशासनाने नव्हे तर त्यांनी पाडली. हा जुलूम जबरदस्तीचा प्रकार सुरु आहे. पोलिसांकडून त्यांचे रक्षण व आमच्यावर दंडुका चालणार असतील तर चालणार नाही.
चोर म्हणून जो शिक्का लागला तो त्यांना पुसता येणार नाही. आज संयम बाळगला बॅरिकेड्स तोडून आम्ही जाऊ शकलो असतो. सरकारचे काम होते त्यांच्या चोरांना तिथे येऊन द्यायचे नाही. दरवेळी आमचा संयम न तुमचा यम हे चालणार नाही. असं ते म्हणाले.