दोन वर्ष अन् दोन महिने मीच पक्का कृषी मंत्री; अब्दुल सत्तारांचे विधान

दोन वर्ष अन् दोन महिने मीच पक्का कृषी मंत्री; अब्दुल सत्तारांचे विधान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेते आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघकीस आला होता.

सचिन बडे | औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेते आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केली होती. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सत्तारांच्या राजीनाम्याची जोरदार मागणीही आली होती. अशातच, आणखी एका नव्या विधानाने अब्दुल सत्तार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मी दोन वर्ष आणि दोन महिने पक्का कृषी मंत्री, असे विधान अब्दुल सत्तारांनी केल्याने सर्वांच्याच भवया उंचावल्या आहेत.

दोन वर्ष अन् दोन महिने मीच पक्का कृषी मंत्री; अब्दुल सत्तारांचे विधान
खुज्या नेतृत्वास लोकशाही आणि स्वातंत्र्याचे मोल काय समजणार; राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर टोला

अब्दुल सत्तार हे मागील काही काळापासून आपल्या विधानाने चांगलेच चर्चेत आले आहे. काहीच दिवसांपुर्वी सत्तार यांनी थेट सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केली होती. सत्तारांच्या या विधानाने राजकारणात प्रचंड खळबळ माजली होती. यावरून राज्यभर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक होत सत्तारांविरोधात अनेक ठिकाणी तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. तर, विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर वाद उफाळल्यानंतर सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख न करता दिलगिरीही व्यक्त केली होती. अशातच एक नव्या विधानाने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

सिल्लोड येथील भराडी-आमठाणा-घाटनांद्रा ते सोयगाव तालुक्यातील तिडका या 20 किलोमीटर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जनतेला संबोधताना अब्दुल सत्तार यांनी नागरिकांनी कृषी विभागाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तसेच, मी दोन वर्ष आणि दोन महिने पक्का कृषी मंत्री राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

दोन वर्ष अन् दोन महिने मीच पक्का कृषी मंत्री; अब्दुल सत्तारांचे विधान
50 खोके नाही तर 200 खोके देतो; मुख्यमंत्री शिंदे यांचे विधान

अब्दुल सत्तार अनेकदा वादग्रस्त वक्तव्याने वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्याचे खासगी सचिव खतगावकर यांना शिवीगाळ केल्याची माहिती होती. तर, जिल्हाधिकाऱ्यांनाही आक्षेपार्ह प्रश्न विचारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामुळे राजकीय वर्तुळात वादंग निर्माण झाले होते. सातत्याने वादात राहणाऱ्या मंत्र्यांवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कारवाई करणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. परंतु, अब्दुल सत्तारांनी मीच कृषीमंत्री राहणार असल्याचा दावा केल्याने राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com