Uddhav Thackeray | Gajanan Kale
Uddhav Thackeray | Gajanan KaleTeam Lokshahi

काउंटडाऊन सुरू, आता खरा मास्टरमाईंड...; गजानन काळेंचा निशाणा

संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. मॉर्निंग वॉक करत चार अज्ञात इसमांनी हा हल्ला केला होता.

मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. मॉर्निंग वॉक करत चार अज्ञात इसमांनी हा हल्ला केला होता. या हल्ल्याचा राजकीय वर्तुळातून निषेध व्यक्त करण्यात येत असून हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी अखेर दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावर मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरेंवर टीका केली.

Uddhav Thackeray | Gajanan Kale
नवनीत अक्का, उद्धव ठाकरेंना बोलतांना इथून पुढं ध्यानात ठेवायचं; सुषमा अंधारेंचा इशारा

काय आहे गजानन काळे यांचे ट्विट?

काउंटडाऊन सुरू. संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणा-या २ जणांना भांडूपमधून अटक. आता खऱ्या मास्टरमाईंडला ताब्यात घ्या, असे म्हणत अप्रत्यक्षरित्या उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

तर, याआधी विरप्पण गँगने कोविड काळात केलेला भ्रष्टाचार पुराव्यासकट बाहेर काढला म्हणून संदीप देशपांडे यांच्यावर झालेला हा हल्ला आहे, हे मुंबईकरांना माहीत आहे. काल परवा लोकशाही, संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच्या गप्पा मारणारे या हल्ल्यातून कोणता पायंडा पाडताय हे फक्त लक्षात असू द्या, असा इशाराही गजानन काळे यांनी दिला होता.

दरम्यान, संदीप देशपांडेंवर शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉक करताना हल्ला करण्यात आला होता. त्यांना रॉड आणि स्टम्पने बेदम मारहाण करण्यात आली होती. संदीप देशपांडेंवर हिंदुजा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. यानंतर आज देशपांडे पत्रकार परिषद घेऊन हल्ल्याची माहिती देणार आहेत. संदीप देशपांडे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com