आपल्या डोक्यात सत्तेची हवा गेल्यावर आपण काय केलं; महाजनांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

आपल्या डोक्यात सत्तेची हवा गेल्यावर आपण काय केलं; महाजनांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

शिंदे-फडणवीस सरकारवर शरद पवार यांनी केली होती. याला गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

जळगाव : शिंदे-फडणवीस सरकारच्या डोक्यात सत्तेची हवा असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. याला आता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अडीच वर्षात आपल्या डोक्यात सत्तेची हवा गेल्यावर आपण काय प्रकार केले याचे आत्मपरीक्षण करावे, असा सणसणीत टोला महाजनांनी शरद पवारांना लगावला आहे.

आपल्या डोक्यात सत्तेची हवा गेल्यावर आपण काय केलं; महाजनांचे शरद पवारांना प्रत्युत्तर
5000 वर्ष स्त्री हि उपभोगाची वस्तू म्हणून उपभोगणार्यांनी भुंकू नये; उर्फी जावेद वादात आता आव्हाडांची उडी

गिरीश महाजन म्हणाले की, अडीच वर्षात आपल्या डोक्यात सत्तेची हवा गेल्यावर आपण काय प्रकार केले याचे आत्मपरीक्षण करावे. आमच्या डोक्यात कुठेही सत्तेची हवा गेलेली नाही आणि जाणारही नाही. आम्ही जमिनीवर राहून काम करतोय, असे त्यांनी म्हंटले आहे.

तर, देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला आमची जमीन माहिती आहे. आम्ही जमिनीवर चालणारे लोक आहोत. नेमके हवेत कोण आहे हे त्यांनी तपासले पाहिजे, असे प्रत्युत्तर शरद पवारांना दिले होते.

आपल्या डोक्यात सत्तेची हवा गेल्यावर आपण काय केलं; महाजनांचे शरद पवारांना प्रत्युत्तर
ICICI बँक कर्ज घोटाळा प्रकरण; कोचर दाम्पत्याला जामीन मंजूर

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारच्या डोक्यात सत्तेची हवा गेली असून सत्ता हातात असेल त्यांनी जमिनीवर पाय ठेऊन राहायचं असत. टोकाला जाण्याची भूमिका काही लोक घेत आहेत, अशी टीका शरद पवारांनी केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com