जयंत पाटलांनी फडणवीसांच्या नादाला लागू नये; मलिकांचे नाव घेत पडळकरांचा इशारा

जयंत पाटलांनी फडणवीसांच्या नादाला लागू नये; मलिकांचे नाव घेत पडळकरांचा इशारा

जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. यावरून गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे.

संजय देसाई | सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, आपला कोणताही संबंध नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. यावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. माझा काही संबंध नाही म्हणाऱ्या नवाब मालिकांना आता जामीन देखील मिळत नाही, असा टोला पडळकरांनी जयंत पाटलांना लगावला आहे.

जयंत पाटलांनी फडणवीसांच्या नादाला लागू नये; मलिकांचे नाव घेत पडळकरांचा इशारा
....त्यामुळे मला निकालाचं काही टेन्शन नव्हतं; एकनाथ शिंदेंचे विधान

जयंत पाटील यांची एक ना अनेक प्रकरण आहेत. ज्यावेळी नवाब मालिकांना ईडीची नोटीस आली, त्यावेळी तेही आपला काही संबंध नाही, असं म्हणायचे. पण, आता त्यांचा जामीन देखील होत नाही, असा निशाणा गोपीचंद पडळकरांनी साधला आहे. त्याच बरोबर आम्ही अडीच वर्ष विरोधात होतो. आम्हाला एक देखील नोटीस आली नाही. आता त्यांना नोटीस आली आहे तर त्या नोटीसीला तोंड द्यावं, असा सल्लादेखील त्यांनी दिला आहे.

जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून बोलताना मला एक हवालदार येऊन ईडीची नोटीस देऊन गेला, या विधानाचाही गोपीचंद पडळकर यांनी समाचार घेतला आहे. जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात प्रचंड तफावत आहे. त्यामुळे जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नादाला लागू नये, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच, कुजके बोलणे, कपटी आणि विश्वासघातकी हे जयंत पाटलांच्या राजकारणाचा मूळ पाया आहे. याशिवाय सभागृहात देखील जयंत पाटील हे नेहमी कुजके बोलणे, टीका-टिपणी करतात. जयंत पाटील यांचा मूळ स्वभाव आहे आणि स्वभाव काही बदलणार नाही, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, असा टोला देखील पडळकरांनी लगावला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

जयंत पाटील यांच्याशी संबंधित काही संस्थांना 'आयएल अँड एफएस' प्रकरणातील काही आरोपी कंपन्यांनी 'कमिशन रक्कम' दिल्याचा आरोप ईडीने केला आहे आणि याच व्यवहारांबद्दल जयंत पाटील यांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवले जातील. मात्र, या आलेल्या नोटीसवर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी ज्या 'आयएल अँड एफएस' कंपनीच्या प्रकरणात ईडीने नोटीस बजावली आहे. त्या कंपनीसोबत माझा रुपयाचाही व्यवहार नाही. जिथे काही देणे-घेणेच नाही, तिथे नोटीस काढली जातेय. ईडी का नोटीस काढते, हे सगळ्या देशाला माहित आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com