मित्र पहिलवान असला पाहिजे कुपोषित नको; गुलाबराव पाटलांचा उध्दव ठाकरेंनी टोला

मित्र पहिलवान असला पाहिजे कुपोषित नको; गुलाबराव पाटलांचा उध्दव ठाकरेंनी टोला

अरविंद केजरीवाल यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती.

मुंबई : राज्यात राजकीय वातावरण तापलेले असतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात नवे समीकरण पाहायला मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावरुन शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी टीकास्त्र सोडले आहे. मित्र पहिलवान असला पाहिजे कुपोषित नको, असा सणसणीत टोला पाटलांनी उध्दव ठाकरेंनी लगावला आहे.

मित्र पहिलवान असला पाहिजे कुपोषित नको; गुलाबराव पाटलांचा उध्दव ठाकरेंनी टोला
मविआच्या पायाखालची वाळू सरकली म्हणूनच त्यांच्या उमेदवाराची स्टंटबाजी : बावनकुळे

नवीन मित्र मिळाला तर तो पहिलवान असला पाहिजे, कुपोषित बालकांबरोबर मैत्री करून काय फायदा. आपची महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे हे आपल्याला माहित असल्याची टीकाही पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. नाशिकच्या मालेगाव येथील झोडगे येथे पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रयत्नातून जलजीवन मिशन योजनेतंर्गत ५१ गाव पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन आज गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना गुलाबराव पाटील यांनी ही टीका केली आहे. बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांना आम्ही सोडले, अशी खोचक टीकाही उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता गुलाबराव पाटील यांनी केली.

दरम्यान, याआधीही गुलाबराव पाटील यांनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला. आमच्यासारखी गद्दार गद्दार म्हणून टीका केली जाते. गुलाबराव पाटील गद्दार झाले, अशी टीका आमच्यावर आमचे विरोधक करतात. पण, गुलाबराव पाटील गद्दार नाही झाले. एक मराठा चेहरा (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) आमच्या शिवसेनेतून बाहेर जात होता, त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली, काय म्हणणं आहे तुमचं? असे गुलाबराव पाटील यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com