हसन मुश्रीफांचे कार्यकर्ते आक्रमक, कागल बंदची हाक; पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

हसन मुश्रीफांचे कार्यकर्ते आक्रमक, कागल बंदची हाक; पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

हसन मुश्रीफ आणि माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या घरावर आज सकाळी सक्‍तवसुली संचालनालयाने छापे टाकले

संजय देसाई | सांगली : माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ आणि माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या घरावर आज सकाळी सक्‍तवसुली संचालनालयाने छापे टाकले. या कारवाईनंतर कागल शहरातील राष्‍ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्‍यांनी या कारवाईच्‍या निषेधार्थ कागल बंदची हाक दिली. दरम्यान, प्रकाश गाडेकर आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानसमोर व त्‍यांच्‍या निवासस्‍थानांच्‍या मार्गांवरही मोठा पोलीस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे.

हसन मुश्रीफांचे कार्यकर्ते आक्रमक, कागल बंदची हाक; पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की
विरोधी पक्षावर दबावाचे राजकारण; मुश्रीफांवरील कारवाईवर राऊतांची प्रतिक्रिया

‘ईडी’चे अधिकारी पोलिसांसोबत आज सकाळी कागल येथे आले. हसन मुश्रीफ व प्रकार गाडेकर यांच्‍या निवासस्थांनी ‘ईडी’अधिकारी माहिती घेत आहेत. दरम्यान, कागल शहरातील देवी चौक आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्यामुळे स्थानिक पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. राष्‍ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचा निषेध करीत आणि आमदार हसन मुश्रीफ यांचा जयघोष करीत मोठ्या संख्येने निवासस्थानी दाखल झाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com