झारखंडमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! हेमंत सोरेन यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

झारखंडमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! हेमंत सोरेन यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

झारखंडमध्ये हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना कधीही अटक होऊ शकते.

रांची : झारखंडमध्ये हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना कधीही अटक होऊ शकते. अशातच, हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी चंपाई सोरेन राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. चंपाई यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

झारखंडमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! हेमंत सोरेन यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
Prakash Ambedkar : ..तोपर्यंत वंचितचा समावेश मविआत झालाय हे मानणार नाही

हेमंत सोरेन यांच्या रांचीमधील निवासस्थानाबाहेर प्रचंड सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. याशिवाय डीजीपी आणि प्रधान सचिवही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पथक त्यांची अनेक तास चौकशी केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जमीन घोटाळ्याप्रकरणी सोरेन यांना 15 दिवस ईडीची कोठडीत होऊ शकते.

या पार्श्वभूमीवर हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी चंपाई सोरेन राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. चंपाई सोरेन यांचा शपथविधी आजच होण्याची शक्यता आहे. तर, हेमंत सोरेन यांच्या अटकेच्या भीतीने झारखंड मुक्ती मोर्चाच्या आमदारांना दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याची तयारी सुरू असल्याचे सूत्रांनी माहिती दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com