Ajit Pawar
Ajit PawarTeam Lokshahi

लव्ह जिहादच्या नावाखाली समाजात विष पेरण्याच काम सुरू : अजित पवार

लव्ह जिहाद विरोधी कायद्यासाठी हिंदु जनआक्रोश मोर्चा; अजित पवारांचा निशाणा

संजय देसाई | सांगली : लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करण्यासाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने हिंदु जनआक्रोश मोर्चा आझाद मैदान येथे काढण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लव्ह जिहादच्या नावाखाली समाजात विष पेरण्याचे काम सुरू आहे, असा निशाणा साधला आहे. सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे क्रांतिवीरांगना इंदुमती पाटणकर यांच्या स्मारकाचे उदघाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते.

Ajit Pawar
लव्हचा अर्थ मला कळतो, जिहादचा अर्थ कळत नाही : सुप्रिया सुळे

लव्ह जिहादच्या नावाखाली समाजात विष पेरण्याचे काम सुरू आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी जाती-जातीत तेढ निर्माण केली जात आहे. मात्र आज जे समाजात सुरू आहे, त्याच्या विरोधात ज्या प्रमाणात उठाव व्हायला पाहिजेल होता. मात्र, तसा होताना दिसत नाही, अशी खंत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी व्यक्त केली.

क्रांतीविरांगणा इंदूमती पाटणकर यांनी स्वातंत्रलढ्याबरोबरच जाती अंताचा लढा उभा केला. त्याकाळी त्यांनी अनेक आंतरजातीय विवाह लावून दिले होते. आता सुद्धा याच भूमीतील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दोन्ही मुलांनी आंतरजातीय विवाह केले आहेत, असं सांगून अजित पवार पुढे म्हणाले, अलीकडे सेक्युलर ह्या शब्दालाच कुठेतरी तिलांजली देण्याचा प्रयत्न काही जण करतात. हे आपल्या भारताच्या दृष्टीने अतिशय अडचणीचं होणार आहे.

मात्र, अजितदादांनी पहाटेच्या शपथविधी वर बोलण टाळाल. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नंतर एक स्टेटमेंट करून त्याच्यावर पडदा टाकलेला आहे. सारखं सारखं ते उगाळू नका. त्याला तीन वर्षे झालेली आहेत. त्यापेक्षा आपण महागाई, बेरोजगारी आत्ताचे जे काही यक्ष प्रश्न निर्माण झालेले त्याच्याबद्दल या मीडियाचाही वापर करून आणि लोकांना जागृत करू, असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

कासेगाव येथील क्रांतीवीरांगणा इंदुमती पाटणकर यांच्या स्मारकासाठी दोन विधानपरिषद सदस्यांच्या निधीतून एकूण 22 लाख आणि सीएसआर मधून पाच लाखाचा निधी देण्याचे अजित पवार यांनी जाहीर केलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com