पुण्यात ठाकरे गट व शिंदे गटात तुफान राडा

पुण्यात ठाकरे गट व शिंदे गटात तुफान राडा

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

पुणे : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानण्यात येत आहे. यावरुन ठाकरे गटाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. अशातच, पुण्यात ठाकरे गट व शिंदे गटात जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे. यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण आणले.

पुण्यात ठाकरे गट व शिंदे गटात तुफान राडा
शिवसेना भवनसुद्धा एकनाथ शिंदेंना मिळेल; रवी राणांचा मोठा दावा

पुण्यात एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते भिडले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यामुळे बाळासाहेबांची शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजीला सुरुवात केली. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाली. पुण्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शहर अध्यक्ष संजय मोरे तसेच बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून शहर प्रमुख नाना भानगिरे यावेळी उपस्थितीत होते.

तणावाची स्थिती निर्माण झाली असल्याने काहीच वेळात पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत दोन्ही परिस्थिती आटोक्यात आणली. घटनास्थळी मोठा पोलिसांचा बंदोबस्त असून पोलीस उपायुक्त देखील या ठिकाणी आले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com