राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाकडून रद्द; राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया, काही पक्षांची क्रेझ...

राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाकडून रद्द; राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया, काही पक्षांची क्रेझ...

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे. यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे.

मुंबई : नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे. यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. वेगवेगळ्या राज्यात मते घेण्यात काही कमतरता आली असेल. पण, आगामी निवडणूकांमधे हा दर्जा पुन्हा मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाकडून रद्द; राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया, काही पक्षांची क्रेझ...
माझ्या वक्तव्याचा 'ध'चा 'म' केला जातोय; वादानंतर चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण, बाळासाहेबांविषयी नेहमीच आदर

राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष म्हणून राष्ट्रवादीचा दर्जा गेल्याच कळालं. आज देशातील वेगवेगळ्या राज्यात निवडणूका झाल्या. त्यानंतर काही पक्षांबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घेतला. फक्त राष्ट्रवादीबाबत असा निर्णय घेण्यात आला, असे नाही. तर, वेगवेगळ्या राज्यात मते घेण्यात काही कमतरता आली असेल. पण, हा पक्षासाठी सेटबॅक नाही. कारण राज्यात पक्षाचे घड्याळ हे चिन्ह कायम आहे. कर्नाटक आणि इतर राज्यातील निवडणुकांमध्ये आम्ही राष्ट्रीय पक्ष हा दर्जा पुन्हा सहज मिळवू, असा जयंत पाटील यांनी म्हंटले आहे.

काही पक्षांची काही काळासाठी क्रेझ असते. आपने अनेक आश्वासनं दिलीयत आणि पक्ष वाढलाय. आम्ही मात्र शक्य तेवढीच आश्वासने देतो. लोकांच्या पैशांवर आश्वासने देणे असे आम्ही करत आहोत नाही. आपने पंजाबमधे जी आश्वासने दिलीयत ती पूर्ण होतायत का हे बघितलं पाहिजे, असा निशाणाही त्यांनी आपवर साधला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीकडून भाजपच्या बाजूने कोणतीही भूमिका घेतलेली नाही. भाजप स्वतः तशी समजत करुन घेत असेल. अदानींच्या प्रकरणात चौकशीला विरोध नाही. फक्त जेपीसीच्या उपयोगाबद्दल शंका असल्यानेच पवार साहेबांनी ते वक्तव्य केल. सावरकर हे महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून सावरकरांबाबत भूमिका घेण्यात आली, असेही जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com