सिंधी समाजाबद्दलच्या वक्तव्याविरोधात गुन्हा दाखल; जितेंद्र आव्हाडांचे स्पष्टीकरण, म्हणाले...

सिंधी समाजाबद्दलच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे : सिंधी समाजाबद्दलच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंधी समाजाबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेपार्ह विधान केल्याची तक्रार भाजप जिल्हाध्यक्ष जमनू पुरस्वामी यांनी दिली होती. यावर जितेंद्र आव्हांडांनी स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या बद्दल सिंधी समाजात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

सिंधी समाजाबद्दलच्या वक्तव्याविरोधात गुन्हा दाखल; जितेंद्र आव्हाडांचे स्पष्टीकरण, म्हणाले...
पंकजा मुंडेंच्या विधानाचा अर्थ वेगळा...; 'त्या' विधानावर गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण

मी भाषणात मी बोललो की, 'सौ जंगली कुत्ते मिलके, एक शेर का शिकार नही कर सकते' आणि तो व्हिडिओ एडिट करून मॉर्फ करून हा व्हिडिओ चालवण्यात आला असून सगळीकडे पसरवण्यात आला आहे. माझ्या बद्दल सिंधी समाजात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला माहित नाही हे कोणी केलं. पण ज्यांनी माझ्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यांनी हा व्हिडिओ कुठून आणला याची पोलीस कधीच चौकशी करणार नाही का? सत्याची परीक्षा घेणार की नाही, असे सवालही जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केले आहेत.

भाषणाच्या दिवशी मी असं काही वेडवाकडे बोललो असतो, तर माध्यमांनी पहिल्याच दिवशी तो दाखवला असता. हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी संध्याकाळी निघतो आणि अख्या गावभर प्रसारित होतो आणि पोलीस चौकशी करत नाही थेट केस दाखल करून टाकतात, असेही त्यांनी म्हंटले आहे.

शिवसेनेचे शिंदे गटाचे गोपाळ लांडगे उल्हासनगरमध्ये जितेंद्र आव्हाडांविरोधात मीटिंग घेऊन आले. लांडगे माझे चांगले मित्र आहेत. मला माहितीये त्यांचा स्वभाव नाहीये. पण, त्यांनी हे कोणाच्या दबावाखाली केले हे मला चांगलं माहिती आहे. आता ओरिजनल व्हिडिओ समोर आला आहे.आता काय करणार माझी माफी मागणार आहात का? तुम्ही माफी मागावी अशी माझी इच्छा पण नाही, असेही आव्हाड म्हणाले आहेत.

मी फक्त पप्पू कलानी यांच्या घरात जातो आणि पप्पू कलानीच्या आशीर्वादाने आम्ही पुढची उल्हासनगर महापालिका जिंकणार आहोत आमचा तिथे महापौर बसणार आहे. उल्हासनगरची सीट देखील राष्ट्रवादी जिंकणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ठाण्यातील सिंधी समाजाने एकत्र येत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी उल्हासनगरमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना सिंधी समाजाला उद्देशून आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा सिंधी समाजाचा आरोप आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com