सरकारने आपल्यावर आलेलं संकट आप्पासाहेबांवर ढकललं; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

सरकारने आपल्यावर आलेलं संकट आप्पासाहेबांवर ढकललं; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 15 श्री सदस्यांना उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबई : खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 15 श्री सदस्यांना उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. तर काही जणांवर उपचार सुरु आहेत. यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. यावरुन लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमातून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे-फडणवीस सरकार शरसंधान साधले आहे. आप्पसाहेब धर्माधिकारी यांचा राजकारणासाठी वापर केला असल्याची टीका त्यांनी केली आहे.

सरकारने आपल्यावर आलेलं संकट आप्पासाहेबांवर ढकललं; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
सुप्रीम कोर्टाने शिंदेंविरोधात निर्णय दिला तरीही शिंदे मुख्यमंत्री...; राहुल नार्वेकरांनी केलं सूचक विधान

खारघर येथे एवढी मोठी दुर्घटना घडली. ही जर चेंगराचेंगरी झाली असेल तर कशामुळे झाली आहे? मृत कुटुंबियांना मी भेटलो असून माझ्या कार्यकर्त्यांनी जखमींची भेट घेतली, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. कार्यक्रमातील सत्य परिस्थिती कोणालाच माहित नव्हती. सीसीटीव्हीमध्ये काहीच आहे का? 5 लाख लोक उपस्थित होती. त्याठिकाणी अॅम्ब्युलन्सला जायलाही जागा नव्हती. नियोजनशून्य कार्यक्रम होता. महाराष्ट्र भूषण कार्यक्रम अर्धा तासात संपायला हवा होता. मात्र, भाषणे लांबत गेली, असा निशाणा त्यांनी साधला आहे.

आप्पासाहेबांनी वेळ दिली असल्याचा दावा मंगल प्रभात लोढा यांनी केला होता. यावरही जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मंगल प्रभात लोढा हे खोटे बोलत आहेत. आप्पासाहेबांनी कार्यक्रम संध्याकाळी घेण्यास सांगितला होता. आप्पासाहेबांचे नाव घेऊन यांनी गर्दी जमवली. तेच आपल्यावर आलेलं संकट आप्पासाहेबांवर ढकललं. आप्पासाहेबांचे नाव घेतलं की कोणीच काही बोलणार नाही हे त्यांना माहित होते. आतापर्यंतच्या सरकारी कार्यक्रमात एवढे बळी गेले. असे कधी ऐकलं आहे का? आप्पासाहेबांमुळे हे झाले हे प्रौपागंडा किती चुकीचा आहे. आप्पसाहेब धर्माधिकारी यांचा राजकारणासाठी वापर केला असल्याची टीका त्यांनी केली आहे, असे टीकास्त्रही आव्हाडांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सोडले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com