संयोगिताराजेंच्या आरोपांवर महंताचे स्पष्टीकरण; अपमान झाला असेल तर...

संयोगिताराजेंच्या आरोपांवर महंताचे स्पष्टीकरण; अपमान झाला असेल तर...

संयोगीताराजेंच्या सोशल मीडिया पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले

नाशिक : रामनवमीच्या पार्श्वभूमीवर संयोगीताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास भेट दिली. यावेळी महंतांनी पूजा पुराणेक्त पद्धतीने करण्यास सुरुवात केली. यास संयोगिताराजे छत्रपती यांनी विरोध करत त्यांना वैदिक पद्धतीने मंत्र म्हणण्यास सांगितले. मात्र, छत्रपती शाहू महाराज यांच्या घराण्यातील असल्याने मी त्यास विरोध दर्शवला, असे संयोगीताराजेंनी सोशल मीडियाद्वारे सांगितले होते. यावरुन राजकारण चांगलेच तापले असून टीका करण्यात येत आहे. यावर अखेर महंत सुधीरदास यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

संयोगिताराजेंच्या आरोपांवर महंताचे स्पष्टीकरण; अपमान झाला असेल तर...
छत्रपती संभाजीनगरात महाविकास आघाडीची सभा होणार; पोलिसांची 'या' 15 अटींवर परवानगी

महंत सुधीरदास म्हणाले की, संयोगीताराजे यांना नाशिकला येऊन दोन महिने झाले. त्या मंदिरात आल्या व मंदिर परिसर फिरल्या. मी माहिती देखील त्यांना सांगितली. त्यानंतर त्यांनी पूजा केली व दक्षिणा देखील मला दिली. मी त्यांना बाहेरपर्यंत सोडायला गेलो होतो. असं कुठलंही वक्तव्य मी केले नव्हते. गैरसमाजातून हा प्रकार झाला. आम्ही कोल्हापूरला जाऊन त्यांची भेट घेणार आहोत. मोठ्या महाराजांनाही निवेदन करू. रथयात्रा, उपवास सोडून मी त्यांना भेटण्यास जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.

ते पुढे म्हणाले, या घटनेला पावणेदोन महिने झालेत. मी त्यांची पोस्ट देखील नाही पहिली. मी तस कुठलंही वाक्य बोललेलो नाही. पुराणोक्त पद्धतीने पूजा करण्याची मागणी त्यांची होती. आपण कुठल्याही पद्धतीचे तसे स्टेटमेंट केलेले नाही. स्मृती शक्ती पुराणोक्त असा उल्लेख मी केला. वेदोक्तच पूजन प्रभू रामांचे होत असते, असं मी त्यांना म्हंटलं होतं. शाहू महाराजांसोबत जी घटना घडली त्याचा आमचा काळाराम मंदिरातील पुजारींचा संबंध नाही. हळदी-कुंकू लावण्याचा मंत्र देखील वेदोक्त पद्धतीने मी म्हंटला होता.

आमच्यासाठी छत्रपती घराणं आदरणीय आहे. काळाराम मंदिरात सर्व जाती-धर्माच्या पूजा होत असतात. संयोगीताराजेंनी तिथे बसून महामृत्युंजय मंत्र, रामरक्षा म्हंटली मी काही ऑब्जेक्शन घेतले नाही. हा सगळा गैरसमाजातून प्रकार झाला आहे. धर्माचे कार्य आम्हाला करायचे आहे. कुठल्याही टीकाटीप्पणीकडे लक्ष न देता हिंदु धर्मासाठी पुढे नेण्यासाठी काम करायचे आहे. व्यक्तिगत आरोप असू शकतात. माझ्या बाजूने कुठलाही व्यक्तिदोष भावना नाही. त्यांना माझ्या बाजूनं अस जर वाटत असेल की अपमान झाला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असेही महंत सुधीरदास यांनी म्हंटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com