Bachchu Kadu
Bachchu KaduTeam Lokshahi

राज्यमंत्री बच्चू कडू भर उन्हात करणार ३ तास श्रमदान, कारण...

अकोला जिल्ह्यातील एका रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपामुळे राज्यमंत्री व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू अडचणीत आले आहे.
Published by :
shamal ghanekar

अमरावती/सूरज दाहाट

 अकोला (akola) जिल्ह्यातील एका रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपामुळे राज्यमंत्री व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू अडचणीत आले आहे. बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यावर कोर्टाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, मात्र मी कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला नाही व न्यायालयाने चूकीचा निर्णय दिला त्यामुळे मी या निषेधार्थ व दुःख व्यक्त करण्यासाठी अकोला येथे उद्या 2 मे रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत भर उन्हात श्रमदान करणार अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली. सरकार मधील मंत्री बच्चू कडू यांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे

Bachchu Kadu
Raj Thackeray यांच्या सभेला परवानगी मिळणार, पण...

अकोला (Akola) जिल्हाचे पालकमंत्री व राज्यमंत्री बच्चू कडू यांनी रस्त्यांच्या प्रस्तावात बदल करून त्या कामांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता.यात बच्चू कडू यांच्यावर न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कोर्टाच्या निर्णयावर प्रचंड नाराजी व्यक्त करत चुकीचा निर्णय न्यायालयाने दिला असा आरोप त्यांनी अमरावतीत (Amravati) बोलतांना केला. यात मी कुठंही भ्रष्टाचार केला नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलाय. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले त्यामुळे माझी प्रतिमा मलिन झाली त्यामुळे या निषेधार्थ व दुःख व्यक्त करण्यासाठी अकोला येथे दुपारी २ ते ५ या वेळेत सलग तीन तास भर उन्हात रस्त्याचे बांधकाम करून श्रमदान करू अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली तर मी अकोला न्यायालयाविरोधात वरच्या कोर्टात जाऊन न्याय मागेल व ज्याचं चुकलं त्यांना ठोकनार असही त्यांनी सांगितले. चुकीच्या पद्धतीने अशा प्रकारचे गुन्हे दाखल होत असल्यास ते चुकीचे आहे. आम्ही प्रचंड मेहनतीने संघटन व नेतृत्व उभं केलं आहे. आह्मी काही धर्माचे झेंडे लावून नेतृत्व उभं केलं नाही असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला.

Bachchu Kadu
राज ठाकरेंच्या सभेपूर्वीच अचानक ओवैसी औरंगाबादेत धडकले; हालचालींना वेग

कोर्टाकडून चुकीचे निर्णय होणे आणि त्याच्याबद्दल त्या प्रकारच्या प्रतिमा विलीन होणे ही अत्यंत दुःखदायक गोष्ट असून ती आमच्यासाठी वेदना देणारी गोष्ट आणि म्हणून आम्ही उद्या दोन ते पाच वाजेपर्यंत भर उन्हात श्रमदान मी स्वतः करून आम्ही त्याचा दुःख व्यक्त करणार आहोत, अस स्पष्टीकरण त्यांनी दिले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com