महाराष्ट्र राज्याचं गीत ठरले आता स्वतंत्र ध्वज तयार करा; मनसेची मागणी

महाराष्ट्र राज्याचं गीत ठरले आता स्वतंत्र ध्वज तयार करा; मनसेची मागणी

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर तब्बल ६२ वर्षांनंतर महाराष्ट्राला अधिकृत 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' राज्यगीत मिळालं

सुरेश काटे | कल्याण : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर तब्बल ६२ वर्षांनंतर महाराष्ट्राला अधिकृत राज्यगीत मिळालं आहे. गीत ठरल्यानंतर राज्याचा अधिकृत ध्वजदेखील असावा, अशी मागणी मनसेनेने केली आहे. कल्याण-डोंबिवलीचे मनसे आमदार राजू पाटील यांनी ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

महाराष्ट्र राज्याचं गीत ठरले आता स्वतंत्र ध्वज तयार करा; मनसेची मागणी
बालेकिल्ल्यात भाजपचा पराभव; एकनाथ शिंदे म्हणाले...

महाराष्ट्राची महती सांगणारं आणि मराठी माणसाच्या मनात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवणारं 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे गीत यापुढं महाराष्ट्राचे राज्यगीत असेल अस ठरलं आहे. या पार्श्वभूमीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी राज्याला अधिकृत गीत मिळाले असल्याने आता राज्याचा अधिकृत ध्वज देखील असावा, अशी मागणी केली आहे.

याबाबत बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी जय जय महाराष्ट्र माझा या गीताला महाराष्ट्र राज्य गीत म्हणून मान्यता दिली ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. त्या अनुषंगाने तमिळनाडूचा स्वतःच्या राज्याचा झेंडा प्रस्तावित आहे. कर्नाटकचा झेंडा प्रस्तावित आहे. एक नोव्हेंबर स्थापना दिवशी तो झेंडा फडकवतात. त्यामुळे महाराष्ट्रात अस्मिता दाखवणारा महाराष्ट्राचे अखंडता आणि संयुक्तिक महाराष्ट्र दिसेल असा महाराष्ट्राचा ध्वज असावा, अशी मागणी केली.

तसेच याची सरकार नक्कीच दखल घेईल व येत्या एक मे रोजी महाराष्ट्र दिनी त्यांचं अनावरण करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ वर्षांनी राज्याला गीत मिळालं असल्याने राज्य शासन ध्वज देखील तयार करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com