Nana Patole | Chandrashekhar Bawankule
Nana Patole | Chandrashekhar BawankuleTeam Lokshahi

Nagpur MLC Election Result : नाना पटोलेंनी हुरळून जाऊ नये : बावनकुळे

नागपूर विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा विजयी झाले आहेत.

नागपूर : नागपूर विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा विजयी झाले आहेत. सुधाकर अडबाले यांनी भाजप समर्थित उमेदवार नागो गाणार यांना मोठ्या फरकाने पराभव केला आहे. हा भाजपला मोठा धक्का मानण्यात येत आहे. परंतु, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या निकालातून आत्मपरीक्षण करावे असे काही नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

Nana Patole | Chandrashekhar Bawankule
फडणवीसांची जादू कोकणात चालली, मात्र नागपुरमध्ये नाही? दया कुछ तो गडबड है'

नागपूरची जागा आम्ही कधीच लढत नाही. ती शिक्षक परिषद लढते भाजपने केवळ पाठींबा दिला. भाजपचा उमेदवार नव्हता. नाना पटोले या निकालाने हुरळून गेले. या विजयातून कुणाचे नुकसान झाले नाही. आम्ही शिक्षक परिषदेला पूर्ण मदत केली. यामुळे हुरळून जाऊ नये. कोकणमध्ये आम्ही जिंकलो आहोत. या निकालातून आत्मपरीक्षण करावे असे काही नाही. भाजपने जी काही मदत करायची होती ती केली. नागपूर भाजप लढले असते तर तीही जिंकली असती, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

अमरावतीमध्ये अजून 80 हजार मते मोजायची आहेत. अमरावतीमध्ये वाट बघू. 90 टक्के मतदार जुन्या पेन्शनबाबत रोष व्यक्त करत होते. पण ही बंद कोणी केली? आमच्या सरकारने ही योजना सुरू करावी अशी मागणी होती. आम्ही त्याबाबत विचार करत होतो. अजित पवार यांनी डोळ्यात अंजन घातले पाहिजे विक्रम काळे यांचा मागच्या वेळचा निकाल बघावा, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला आहे. तर, साडेसात हजार मतांनी सत्यजित तांबे पुढे आहे ती निवडणूक एकतर्फी असल्याचा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com