जनाची नाही मनाची लाज असेल तर सरकारने...; पटोलेंचं टीकास्त्र

जनाची नाही मनाची लाज असेल तर सरकारने...; पटोलेंचं टीकास्त्र

जालन्यात ओबीसी समाजाची जाहीर एल्गार महासभा होत आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

नागपूर : जालना जिह्यातून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. त्याच जालन्यात आज ओबीसी समाजाची जाहीर एल्गार महासभा होत आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. जनाची नाही मनाची लाज असेल तर जातीनिहाय जनगणना सरकारने करावी. संविधानाला मातीमोल करण्याचे काम भाजप करत आहे, दोन समाजात वाद सरकारच्या वतीने उभा केला जात आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

 जनाची नाही मनाची लाज असेल तर सरकारने...; पटोलेंचं टीकास्त्र
Manoj Jarange Patil : 70 वर्षात आम्हाला कुणी आरक्षण दिले नाही याचे उत्तर आम्हाला पाहिजे

मध्यमवर्गीयांची दिवाळी अंधारात गेली, अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बेरोजगार छोटे दुकानदार आत्महत्या करत आहेत. सरकारचे चुकीचं नियोजन लोकांच्या जीवावर बेतत आहे. जे गोष्ट तुमच्या हातात नाही, त्याच आश्वासन देतात. मराठा आंदोलकावर गृहमंत्र्यांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आज निर्माण झालेल्या परिस्थितीला जबाबदार आहे, अशी टीका नाना पटोलेंनी शिंदे-फडणवीसांवर केली आहे.

आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊन असे भाजप नेते म्हणत होते. आता का देत नाही, मुख्यमंत्री देतील म्हणत दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुक ठेवण्याचे काम भाजप करत आहे, असाही निशाणा त्यांनी भाजपवर साधाला आहे.

दरम्यान, शिवसेना राड्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, राड्याचा महाराष्ट्र करण्याचं काम करत आहे. महाराष्ट्राची प्रथा परंपरा संस्कृती बिघडवण्याचे काम केले जात असून ही संस्कृती देशाला दाखवण सुरू आहे. याला गृहखातं जबाबदार आहे. आरोपी मौजमस्ती करताना ललित पाटील प्रकरणातून दिसले. दवाखाने भकास आहे, जनतेच्या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याचे काम सरकार करत आहे, असाही घणाघात त्यांनी केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com